आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाच्या गळ्याभाेवती नाळेचे चार वेढे असूनही प्रसूती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बाळासाेबत सुरेखा वाल्मीक पाटील.
जळगाव - ‘माझी त्याच्याशी नाळ जुळलेली अाहे,’ असे अापण अनेकदा सहज म्हणताे. मात्र, हीच नाळ गर्भात अर्भकाच्या गळ्याभाेवती वेढली गेली तर त्याच्या जीवावर बेतू शकते. सामान्यत: दाेन वेढे असलेले अनेक बाळ असतात. लाखातून एखाद्याच्या गळ्याभाेवती तीन तर चार वेढे असतात. मात्र, ख्वाजामियाॅ चाैकातील डाॅ. राधेश्याम चाैधरी यांच्या सृष्टी हाॅस्पिटलमध्ये गळ्याभाेवती नाळचे चार वेढे असलेल्या एका बाळाचा जन्म झाला. या बाळाची प्रकृती ठणठणीत अाहे.

चांदसर येथील सुरेखा वाल्मीक पाटील (वय २७) यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता सृष्टी हाॅस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूती करण्याअगाेदर कलर डाॅपलरने तपासणी केली असता, बाळाच्या गळ्याभाेवती नाळचे चार वेढे असल्याचे दिसले. तरीही डाॅ. चाैधरी यांनी महिलेची नार्मल डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. अन‌् महिला सुखरूप प्रसूत झाली. तसेच बाळाची प्रकृती ठणठणीत अाहे.

डाॅ. चाैधरी यांनी जाेखीम पत्करून नाॅर्मल डिलिव्हरी केल्याने बाळाची अाणि अाईचीही प्रकृती चांगली अाहे. वाल्मीक पाटील, रुग्ण महिलेचे पती

काय खबरदारी घ्याला हवी
गर्भातबाळाच्या गळ्याभाेवती नाळचे िकती वेढे अाहेत िकंवा नाही. त्याची नेमकी स्थिती काय अाहे. या सर्व गाेष्टी बघण्यासाठी प्रसूतीच्या अगाेदर प्रत्येक मातेची कलर डाॅपलरने तपासणी करणे गरजेचे अाहे.

१२० सेंटीमीटरपर्यंत हाेती नाळची लांबी
साधारणत:नाळची लांबी ३५ सेंमी तर, जास्तीत जास्त ७० सेंमी असते. मात्र, काहींमध्ये कमी असल्यास प्रसूतीला विलंब हाेऊन वार (प्लासेंटा) जन्माच्या अाधीपासूनच बाळ अाणि अाईच्या अाराेग्याची गुंतागुंत वाढू शकते. तर जास्त असल्यास गर्भात बाळ गाेल िफरताना नाळचे वेढे गळ्याभाेवती घट्ट अावळल्यास बाळ दगावण्याची शक्यता असते. रविवारी सुरेखा पाटील यांच्या प्रसूतीत नाळची लांबी १२० सेंमीपर्यंत हाेती. चार वेढे बाळाच्या गळ्याभाेवती हाेते. त्यामुळे अतिशय दुर्मिळ अशी ही प्रसूती हाेती.

असे अाहे नाळेचे काम
अाराेग्यसंघटनेच्या सर्वेक्षणानुसार ते ३७ टक्के बाळाच्या गळ्याभाेवती नाळचे ते वेढे असतात. गर्भात फ‍िरत असताना बाळाच्या गळ्याभाेवती हे वेढे तयार हाेतात. बाळाच्या शरीराला रक्तपुरवठा अाणि अाॅक्सिजन देण्याचे काम नाळ करत असते. मात्र, गळ्याभाेवती घट्ट वेढा अावळल्यात बाळ अाईच्या पाेटातच शाैच करते. शिवाय अाॅक्सिजन मिळाल्याने गुदमरून बाळ अाणि कधी अाई सुद्धा दगावण्याची शक्यता असते.शिवाय अशा प्रकारात प्रसूतीला उशीर झाला, तर सिझेरियन करण्याची गरज पडते. काही प्रकारात नाळच्या घट्ट वेढ्यामुळे गुदमरलेल्या बाळाच्या मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने जन्मत:च बाळाला झटके येणे, मतिमंदत्व येण्याची काहीवेळा शक्यता असते.
डाॅ. चाैधरी यांनी जाेखीम पत्करून नाॅर्मल डिलिव्हरी केल्याने बाळाची अाणि अाईचीही प्रकृती चांगली अाहे. वाल्मीक पाटील, रुग्ण महिलेचे पती