आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कारभार - शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी संथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्यभरात शिधापत्रिका ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम जलदगतीने सुरू असताना जिल्ह्यात मात्र कासवगतीने हे काम सुरू असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. नोंदणीचे काम करीत असलेल्या एजन्सीकडून केवळ 15 हजार शिधापत्रिकांचीच नोंदणी झाली असून, अद्याप साडेआठ लाखांचा पल्ला गाठायचा आहे. जळगाव जिल्ह्यात 8 लाख 69 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. ऑनलाइन करण्याच्या कामात सध्या प्रथम क्रमांकावर सातारा, दुसर्‍या क्रमांकावर अमरावती तर तिसर्‍या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे; मात्र या नोंदणीच्या कामात जळगाव जिल्ह्याने अद्यापही गती पकडलेली नाही. नोंदणीचे काम खासगी एजन्सीला देण्यात आले असून, तालुकास्तरावरही काम सुरू आहे.
कंत्राटी पद्धतीने नोंदणीचे काम - शासनातर्फे अंत्योदय, बीपीएल व अन्नपूर्णा योजनेंतर्गत लाल, पिवळ्या व शुभ्र शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार रेशन धान्य व रॉकेलचे वितरण केले जाते. तथापि, आता या शिधापत्रिका ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यात कुटुंबप्रमुखाचे नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख, मोबाइल अथवा फोन क्रमांक, सदस्यसंख्या, प्रमुखाचे बॅँक खाते क्रमांक यासह विविध बाबींचा समावेश आहे. भविष्यात शासनाकडून रेशनधारकाला थेट रोख अनुदान देण्याचा निर्णय झाल्यास त्याचा नोंदणीकामी फायदा होऊ शकणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच शिधापत्रिका ऑनलाइन करण्याचे काम सुरू झाले असून, कंत्राटी पद्धतीने ते सुरू आहे.
बोगस कार्डांचाही शोध घ्यावा - गेल्या वर्षी बोगस बीपीएलधारकांची शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यात शासनाने अगोदर जाहीर करून स्वत:हून नावे कमी करून घेण्याचे आवाहन केले होते; अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बर्‍याच बीपीएलधारकांनी नावे कमी करवून घेतली होती. त्यानुसार शिधापत्रिकांचीही चौकशी करून नोंदणी करावी, अशी मागणी होत आहे
4शासन निर्देशांनुसार शिधापत्रिका ऑनलाइन करण्याचे काम सुरू झाले आहे. अद्याप 15 हजारांचीच नोंदणी झाली असली तरी आगामी काळात गती येईल. शिधापत्रिकांवर नमूद बाबींसह नव्याने नोंदी होत आहे.के.सी.निकम, जिल्हा पुरवठा अधिकारी