Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Rashtrapati Pratibhatai Patil Book Written By Deelip Surwade At Bhusawal

‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल!

प्रतिनिधी | Apr 26, 2012, 08:54 AM IST

  • ‘राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल!

भुसावळ: ऐकणं आणि बघणं या गोष्टीत विभागलेली आजची पिढी विचार करणं या गोष्टीसाठी मनन, चिंतनाची आवश्यकता मानत नाही, असे विदारक चित्र प्रकर्षाने जाणवते. देशाच्या प्रथम नागरिक म्हणून आपल्याच जिल्ह्यातील महिला विराजमान आहेत. हे आजही बर्‍याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्यामुळे साहित्यिक दिलीप सुरवाडे यांनी लिखित संपादित केलेले ‘भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसह सर्वच वाचकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांनी व्यक्त केले.
साहित्यिक दिलीप सुरवाडे लिखित संपादित केलेल्या ‘भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ या पुस्तकाचे प्रकाशन नाहाटा महाविद्यालयात करण्यात आले. त्या वेळी मोहन फालक हे बोलत होते. ते म्हणाले की, देशाच्या सार्वभौम पदावर असतानाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आम्ही भेटायला गेलो असताना जे आदरातिथ्य केले होते ते अविस्मरणीय आहे. माहेराच्या माणसांना त्या कधीच विसरल्या नाहीत. त्यामुळे आपल्याच शहरातील साहित्यिक दिलीप सुरवाडे यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या विषयी जे पुस्तक लिहिले आहे. ते विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी ठरेल, असेच आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून महाविद्यालयाच्या ग्रंथालयात या पुस्तकाच्या 10 प्रती ठेवण्यात येतील. व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.

Next Article

Recommended