आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राष्ट्रवादी’चे आंदोलन, मात्र स्वपक्षीय नगरसेवकांची दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्याचे पशुसवंर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असभ्य शब्दात टीका केल्याने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाकडे पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर जानकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहर पोलिसांनी वेळीच धाव घेऊन पुतळा आंदोलकांच्या हातातून हिसकावला. त्यानंतर प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी, अॅड.रवींद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, प्रदेश सदस्य तथा माजी नगराध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष मोहन निकम, शेख पापा शेख कालू, तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य नाना पवार, बुटासिंग चितोडिया, मुन्ना सोनवणे आदींनी राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून दुचाकीवर निषेध रॅली काढली. यानंतर प्रांत कार्यालयासमोर पुतळा दहनाचा प्रयत्न फसला. मात्र, आंदोलकांनी जानकर यांच्या प्रतिमेवर शाई फेकून निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

^आपल्या पक्षाच्याकामासाठी सर्वांनी एकत्र येणे अपेक्षित आहे. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक एकत्र येत नाही. आंदोलन होणार आहे, याची सर्वांना पूर्वकल्पना होतीच. माध्यमातूनदेखील तसे कळवले होते. गुरुवारी केलेले आंदोलन यशस्वी झाले . विजयचौधरी, माजी नगराध्यक्ष, भुसावळ
^गुरुवारी आंदोलन असल्याबाबत बुधवारी रात्री उशिराने निरोप मिळाला होता. मात्र, दुर्गा विसर्जन मिरवणूक असल्याने सविस्तर माहिती घेता आली नाही. सकाळी संपूर्ण माहिती घेतली खरी, परंतु वेळेअभावी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना निरोप पोहोचवता आला नाही. रवींद्रपाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भुसावळ

^भुसावळातील निषेधमोर्चासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निरोप अथवा माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे गुरुवारच्या मोर्चामध्ये सहभागी होता आले नाही. राजेंद्रविश्वनाथ चौधरी, जिल्हा चिटणीस, राष्ट्रवादी

^आंदोलनाविषयी कुणाकडूनहीनिरोप मिळाला नव्हता. जिल्हा पातळीवरूनदेखील पूर्वसूचना नव्हती. तत्पूर्वी, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच याप्रकरणी कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिलेला आहे. त्या आदेशाचे पालन करणारा मी राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. उमेशनेमाडे, माजी नगराध्यक्ष

^बाहेरगावी असल्यामुळे निषेध मोर्चात सहभागी होता आले नाही. या निषेध मोर्चासंदर्भात निरोप मिळाला होता. शहरात असतो तर मोर्चात नक्की सहभागी झालो असतो. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष, नगरपालिका भुसावळ

बातम्या आणखी आहेत...