आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड्यांवर छापा; माजी महापाैर, नगरसेवकास अटक, १९ जण पाेलीसांच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जुन्याबसस्थानक शेजारील जुगार अड्ड्यावर अािण शिवाजीनगरात रेल्वेस्थानकाच्या दादऱ्याजवळ सट्टा घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या दाेन पथकाने साेमवारी दुपारी २.१५ वाजता कारवाई केली. यात माजी महापाैर अशाेक कािशनाथ सपकाळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह १९ सटाेड्यांना अटक करण्यात अाली अाहे. त्यांच्याकडून लाख २९ हजार ८९० रुपयांची राेकड जप्त करण्यात अाली अाहे.

शहरात गुन्हेगारी माेठ्या प्रमाणात वाढलेली अाहे. त्यामुळे पाेिलस प्रशासनावर सध्या नागरिकांचा प्रचंड राेष अाहे. गुन्हेगारी राेखणाऱ्यावर पाेलिस प्रशासनातर्फे विविध उपाय याेजना अाखल्या जात अाहेत. त्याचा एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेेने पुढाकार घेऊन अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईस सुरुवात केली अाहे. त्याचा श्रीगणेशा साेमवारी झाला.

जुन्याबसस्थानकाजवळून १६ जणांना अटक
स्थानिकगुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी साेमवारी सट्टा, जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकण्यासाठी दाेन विशेष पथके तयार केले हाेते. यात एका पथकात त्यांच्यासह दीपक लगड, रवींद्र गिरासे, बापूराव भाेसले, प्रकाश इंगळे, भास्कर पाटील, ‌श्रीकृष्ण पटवर्धन, चंद्रकांत पाटील, प्रकाश महाजन, लिलाधर महाले, रवींद्र घुगे, जयंत चाैधरी यांचा समावेश हाेता. या पथकाला नगरसेवक नवनाथ दारकुंडे हा जुन्या बसस्थानकाजवळील विठ्ठल साेनवणे यांच्या इमारतीतील त्यांच्या मालकीच्या साेशल क्लबवर पत्ते खेळत असल्याची माहिती मिळाली हाेती. यावरून पथकाने दुपारी २.१५ वाजता क्लबवर छापा टाकला. या वेळी गजनान राजाराम चाैधरी (रा. खंडेरावनगर), शफी मुश्ताक खाटीक (किनाेद), इम्रान बेग हमीद बेग (इच्छादेवी चाैफुली), मनीष पुरुषाेत्तम वाघ (रा.खेडी राेड), नईम खान दावर खान (रा.भवानीपेठ), संजय अशाेक साेनवणे (रा.कंचननगर), राेशन मनाेहर साेनार (रा.रामेश्वर काॅलनी), गाेपीचंद दलू चव्हाण (रा.भादली), मेहमूद शहा बिस्मिल्ला शहा (रा. शिवाजीनगर), किरण रमेश साेनवणे (रा.कंचननगर), अरुण भीमराव गाेसावी (रा.जानकीनगर), इक्बाल खान शाहू खाॅं (रा.शाहूनगर), वसीम अब्दुल्ला वाव (रा.जैनाबाद), रऊफ गनी पटेल (रा.रिंगणगाव), अनिल प्रताप नेतले (रा. कंजरवाडा), मनाेज साेपान भाेळे (रा.जुने जळगाव) हे जुगार खेळताना अाढळून अाले. पाेलिसांनी नगरसेवक दारकुंडेसह १६ जणांना अटक करून त्यांच्याकडून लाख २६ हजार ६६० रुपये राेख जप्त केले अाहे.
दुसऱ्यापथकांचीही माेहीम फत्ते
दुसऱ्यापथकातील सहायक पाेलिस उपनिरीक्षक नुराेद्दीन शेख, रवींद्र घुगे, संजय सपकाळे, रामकृष्ण पाटील यांनीदेखील दुपारी शिवाजीनगरातील रेल्वेस्थानकाच्या दादऱ्याजवळ असलेल्या रिक्षा स्टाॅपजवळ छापा टाकला. यात शेख कय्यूम (वय ३१, रा. गेंदालाल मिल) याला अटक केली असून त्यांच्याकडून हजार २३० रुपये जप्त करण्यात अाले अाहे. त्याने माजी महापाैर अशाेक सपकाळे यांच्यासाठी सट्टा घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी सपकाळे यांनादेखील अटक केली अाहे.

दाेघांमध्ये हाडवैर
एकेकाळचे भागीदार असलेल्या सपकाळे अािण दारकुंडे यांच्यात सध्या िवळ्या भाेपळ्याचे नाते अाहे. गुरुवारी दारकुंडे यांनी सपकाळेंचा जामीन अर्ज रद्द करण्यासंदर्भात न्यायाधीशांना तक्रार केली हाेती. त्यामुळे दाेघांमध्ये सध्या हाडवैर अाहे.

सट्टा, जुगार प्रकरणात अटकेत असलेल्या माजी महापाैर सपकाळे नगरसेवक दारकुंडे यांची पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी कानउघाडणी केली. दाेघांमध्ये सध्या सुरू असलेल्या वादामुळे शांतता भंग हाेत अाहे. त्यामुळे यापुढे अशा तक्रार अाल्या तर कठाेर कारवाईचा इशाराही अधीक्षकांनी दिला.

एसपींनी केली कानउघाडणी
पाेलिसांनी ताब्यात घेतलेले अशाेक सपकाळे, नवनाथ दारकुंडे सटाेडे.