आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय बांधल्यास रेशन अन् अाधारकार्ड रद्द, अनुदानाचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहर हगणदारीमुक्तीचा विषय महापालिकेच्या मानगुटीवर बसला अाहे. ३१ अाॅगस्टपर्यंत शहर हगणदारीमुक्त झाल्यास महापालिकेला शासकीय अनुदानापासून वंचित रहावे लागणार अाहे. त्यामुळे पालिकेने अाता उघड्यावर बसणारे वैयक्तिक शाैचालयाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड, अाधारकार्ड रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला अाहे. या लाभार्थ्यांची यादी थेट तहसीलदारांना देऊन शासकीय लाभ देणे बंद केले जाणार अाहेत. विशेष म्हणजे अशा लाभार्थ्यांच्या मुलांनाही शाळेतून काढण्याचाही प्रस्ताव दिला जाणार अाहे. 
 
राज्यातील हगणदारी मुक्त झालेल्या काही निवडक शहरांमध्ये जळगाव महापालिकेचा समावेश अाहे. त्यामुळे महापालिकेची नाचक्की झाली असून अधिकारी पदाधिकाऱ्यांना मान खाली घालण्याची वेळ अाली अाहे. पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे उपसचिव सुधाकर बाेबडे यांनी ३१ अाॅगस्टपर्यंत शहर हगणदारीमुक्त झाल्यास शासनाकडून दिले जाणारे सर्व अनुदान बंद करण्याचा इशारा दिला अाहे. त्यामुळे महापालिकेत दरराेज सकाळ सायंकाळी हगणदारीमुक्तीचा अाढावा घेतला जात असून बैठकांचा सपाटा सुरू अाहे. 
 
हगणदारी मुक्तीसाठी प्रबोधन : गुजरातमधीलराशीद अन्सारी यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील झाेपडपट्टी भागात हगणदारीमुक्तीसाठी प्रबाेधन केले जाणार अाहे. शासन नियुक्त सामाजिक संस्था असलेल्या जागरण पहेलच्या माध्यमातून नागरिकांना वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करणे तसेच उघड्यावर बसण्याबाबत प्रबाेधन केले जाणार अाहेेे. या संस्थेने नुकतेच मालेगाव येथे काम केल्याने त्याचा प्रशासनाला फायदा झाल्याचे सांगण्यात अाले. अन्सारी हे सोमवारपासून तांबापुरा, शिवाजीनगर अादी परिसरात नागरिकांच्या भेटी घेणार असून नागरिकांना महत्व समजावून सांगणार अाहेत. 

अनुदानाचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई 
महापालिकेने शहरातील बऱ्याच लाभार्थ्यांना हजारांच्या अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत केला अाहे. तरीही अनेकांनी अनुदान घेऊन शाैचालयाचे बांधकाम सुरू केलेले नाही. वारंवार नाेटीस देऊनही काहीही उपयाेग हाेत नसल्याने अाता अशा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत अाहे. त्यांचेही रेशनकार्ड, अाधारकार्ड रद्द करण्यासाठी तहसीलदारांना प्रस्ताव दिला जाणार अाहे. तसेच त्यांच्या मुलांची नावे शाळेतून काढून टाकण्याची कारवाई पुढच्या टप्प्यात केली जाणार असल्याचे सांगण्यात अाले. अशा प्रकारची कारवाई हरियाणा सह काही राज्यात करण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. 
 
तांबापुरात ३० कर्मचारी तैनात 
शहरातीलसगळ्यात माेठी समस्या तांबापुरा परिसरात अाहे. या भागात उ‌घड्यावर बसणाऱ्यांचे प्रमाण अधिक अाहे. शहराचा एन्ट्री पॉईंट असल्याने नागरिकांचे स्वागत घाणीने हाेत अाहे. त्यामुळे महापालिकेने या भागात सकाळ सायंकाळी उघड्यावर बसणाऱ्यांना अाळा घालण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. 
बातम्या आणखी आहेत...