आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ration Card, Aadhar Card Issue At Jalgaon, Divya Marathi

रेशनकार्ड, आधारकार्डद्वारेही मिळणार आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आर्थिक दुर्बल कुटुंबांना दज्रेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता रेशनकार्ड अथवा आधारकार्डद्वारेही मिळणार आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘जीवनदायी कार्ड’ अनिवार्य करण्यात आले होते.
दारिद्रय़रेषेखालील व दारिद्रय़रेषेवरील (केशरी शिधापत्रिकाधारक) नागरिकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने 21 नोव्हेंबर 2013 पासून जीवनदायी योजना सुरू झाली. या योजनेंतर्गत 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व 121 फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो. त्यासाठी लाभार्थी डाटा अर्थात रेशनकार्डच अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, पुरवठा विभागाने या कार्डधारकांची माहितीच अपडेट केली नसल्याने जवळपास 40 टक्के नागरिक योजनेपासून वंचित राहात होते, तर कुठे एका कुटुंबातील सदस्यांची नावे दुसर्‍यांच्या कार्डमध्ये एकत्र झाली होती. काहींचे पत्ते बदलले. त्यामुळे अनेकांना योजनेपासून वंचित राहावे लागत होते.
या समस्यांची दखल घेत शासनाने अखेर रेशनकार्ड व आधारकार्डशिवाय लाभ देण्याची सूचना संबंधित विमा कंपनी व त्या-त्या जिल्ह्यातील रुग्णालयांना सेवा देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आपले रेशनकार्ड घेऊन रुग्णालयात जाणार्‍यांना लाभ दिले जातील; मात्र रेशनकार्डवर तारीख असणे बंधनकारक आहे. ती नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन तारीख टाकून घ्यावी, असे आवाहनही शासनाने केले आहे.
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख
कुटुंबातील एक व्यक्ती अथवा संपूर्ण कुटुंबाला दीड लाखांपर्यंत उपचाराची सुविधा आहे; मात्र मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 2.50 लाख लाभ मिळतो. तसेच कुठलीही तपासणी, परीक्षण व रोगनिदान, वैद्यकीय उपचार, औषधे, शस्त्रक्रिया, उपचार, भोजन, एका बाजूचा प्रवास खर्च या सेवांचा लाभ मिळेल.
2450 रुग्णांसाठी साडेपाच कोटी मंजूर
राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू झाल्यापासून 21 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील 2365 रुग्णांनी अर्ज केले होते. त्यापैकी 2450 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यासाठी रुग्णालयांना 5 कोटी 40 लाख 28 हजार 225 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.