आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटनेता हटवण्यासाठी राष्ट्रवादी एकवटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राष्ट्रवादीत उपनगराध्यक्ष निवडीनंतरही कुरघाेड्या सुरूच अाहेत. पक्षाच्या २० नगरसेवकांनी रविवारी (७ फेब्रुवारी) बैठक घेऊन गटनेता नईमखाँ सिद्दीकखाँ यांना बदलवण्याची नाेंद प्राेसिडिंगमध्ये घेतली. एवढेच नव्हे तर गुरुवारी (दि. ११) जिल्हाधिकाऱ्यांना या बदलाची नाेंद करण्यासाठी निवेदन देण्यात अाले.
एकीकडे गटनेता हटवण्याच्या हालचाली सुरू अाहेत. मात्र, दुसरीकडे गटनेता नईमखाँ यांनी उपनगराध्यक्ष निवडीच्या सभेत उपस्थित राहून युवराज लाेणारी यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला हाेता. परंतु तरीही अनुपस्थित राहणाऱ्या तीन सदस्यांना अपात्रतेपूर्वी बजावण्यात येणारी ‘क्षमापन नाही,’ ही नाेटीस दिली अाहे. परिणामी सत्ताधाऱ्यांत पुन्हा कुरघाेड्या सुरू झाल्या अाहेत. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून अालेले पण कालांतराने भाजपसाेबत घराेबा करणारे नगरसेवक लाेणारी यांनाच उपनगराध्यक्ष निवडीत मतदान करण्याचा पक्षादेश गटनेता नईमखाँ यांनी काढून स्वकीयांना धक्का दिला हाेता. मात्र, पक्षविराेधी कारवाया करणाऱ्यालाच जवळ केल्याने अाता थेट गटनेत्यालाच हटवण्याची खेळी सत्ताधाऱ्यांनी पद्धतशीरपणे खेळली अाहे.

नगराध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक : नगराध्यक्षअख्तर पिंजारी यांच्या निवासस्थानी रविवारी राष्ट्रवादीने गटनेता बदलण्यासाठी बैठक घेतली. त्यात २० नगरसेवकांनी उपस्थिती देऊन गटनेता बदलवण्याचा ठराव करण्यात अाला. तसेच नवीन गटनेता म्हणून सारिका युवराज पाटील यांचे नाव सूचित करून त्याची नाेंद प्राेसिडिंगमध्ये घेण्यात अाली. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादीच्या २० नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गटनेता बदलाची नाेंद घेण्याबाबत प्राेसिडिंगच्या नकलेसह अर्ज दाखल केला. मात्र, त्यानंतर गटनेता नईमखाँ, उपनगराध्यक्ष युवराज लाेणारी, राजेंद्र अावटे, जुबेर पठाण यांनी गटनेता बदलाचा नगरसेवकांनी केलेला ठराव नियमबाह्य असून ज्या नगरसेवकांचे नाव गटनाेंदणीत नाही, अशांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात अाल्या अाहेत. काेणताही निर्णय घेण्यापूर्वी गटनेता म्हणून अामचे मत विचारात घ्यावे, असे पत्र प्रशासनाला दिले अाहे. त्यामुळे राजकीय गुंता वाढला अाहे.

^पक्षाचा गटनेता बदलण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. नियमानुसार ठराव करून सारिका युवराज पाटील यांची नवीन गटनेता म्हणून निवड केली. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील नाेंद घेण्याचे निवेदन देण्यात अाले अाहे. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष,भुसावळ

^गटनेता बदलाची प्रक्रिया मुळात चुकीची अाहे. काहींच्या स्वाक्षऱ्या बनावट अाहेत. गटात नसलेल्या नगरसेवकांच्याही स्वाक्षऱ्या घेण्यात अाल्या अाहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले अाहे. नईमखाँ सिद्दीकखाँ, गटनेता,राष्ट्रवादी, भुसावळ

नईमखाँ सिद्दीकखाँ यांना हटवण्याची कारणे
राष्ट्रवादीच्यादाेन स्वीकृत नगरसेवकांच्या जागा रिक्त अाहेत. त्यांचा प्रस्ताव विश्वासात घेता गटनेता खान हे देणार असल्याची कुणकुण लागली हाेती. उपनगराध्यक्ष निवडीतही लाेणारींच्या नावाचा पक्षादेश सर्वसंमतीने काढला नव्हता. म्हणून नईमखाँ सिद्दीकखाँ यांना हटवून सारिका पाटील यांना गटनेता निवडण्यात अाले. त्यामुळे शहराचे राजकारण ढवळून निघाले.

‘क्षमापन नाही,’ नाेटीस बजावली
गटनेतानई मखाँ सिद्दीकखाँ यांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीत पक्षादेशाचे उल्लंघन करून सभेत अनुपस्थित रािहलेल्या सुषमा उमेश नेमाडे, जरिया मिनू शिवरतनसिंग तरन्नुम इद्रिस यांना अपात्रतेपूर्वीची क्षमापन नाही. या सदरची नाेटीस (जावक क्रमांक / २०१६) बजावली अाहे. येत्या दाेन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र सदस्यता अनर्हता अधिनियमानुसार तिन्ही नगरसेविकांना अपात्र करण्याबाबत अर्ज दाखल हाेईल. त्यांची अपात्रता निश्चित अाहे, असे गटनेता नईमखाँ सिद्दीकखाँ यांनी सांगितले.