आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मंगळ’भेटीने शाळांमध्ये आनंदोत्सव, रायसानी महाविद्यालयात भारतमातेचा जयघोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बंगळुरूयेथील इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने तयार केलेले मंगळयान बुधवारी मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले आणि भारत पहिल्याच प्रयत्नात MOM (Mars Orbiter Mission) अर्थात मंगळ मोहीम यशस्वी करणारा पहिला देश ठरला आहे. या यानाने २४ सप्टेंबरला सकाळी सात वाजून १७ मिनिटांनी मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला आणि नियोजित वेळेत ही मोहीम यशस्वी झाली. भारताने अंतराळात बजावलेल्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांत जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
मंगळ मोहीम यशस्वी करून आमच्या शास्त्रज्ञांनी पूर्वजांबद्दल ऋण व्यक्त करीत भावी पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. संपूर्ण देशाने हे यश साजरे केले पाहिजे. आपला क्रिकेट संघ एखादी मालिका जिंकल्यावर अवघा देश जल्लोष करतो. त्या पेक्षाही मंगळयानाचे यश हजारपटीने मोठे आहे. शाळा, कॉलेजांनी या यशाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पहिल्याचप्रयत्नात यश
मंगळमोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरणारा पहिला देश ठरल्याबद्दल रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करीत आनंद साजरा केला. या वेळी सर्वांनी एकत्र येऊन ‘भारत माता की जय’ असा जयघोष करीत जल्लोष केला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भट प्राध्यापक उपस्थित होते.
युवाशक्ती फाउंडेशन : एम.जे.कॉलेज येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या वेळी अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, सौरभ चतुर्वेदी, रवी महाजन, भवानी अग्रवाल, गणेश देशमुख, साहिल खान, विनोद बावस्कर आदी उपस्थित होते.
हर्ष पटेल (विद्यार्थी)- जागतिकपातळीवर अनेक संशोधनांमध्ये भारतीय संशोधक सहभागी होतात आता या यशस्वितेमुळे नक्कीच भारताचे नाव जगात उंचावर पोहोचले आहे, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी वाव मिळेल. याचा मला आनंद होतोय .

प्रशांतसैंदाणे (विद्यार्थी) अत्यंतप्रेरक असे हे कार्य असून आता खऱ्या अर्थाने व्हीजन ट्वेंटी ट्वेंटीच स्वप्न पूर्ण होईल, असा मला वाटतंय. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, या यशाची माझ्या आयुष्यात नोंद होईल. भारताची नक्कीच प्रगती होईल यात शंका नाही.
विद्याकोळी (विद्यार्थिनी)- शास्रज्ञजणू एक नवीन संदेश देताहेत; हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. या शास्रज्ञांच्या मते जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. पंतप्रधानांनी केलेले आवाहन नक्कीच योग्य आहे, कारण संशोधनालाही जास्त महत्त्व आहे .
रियाकौरणी (विद्यार्थिनी)- हेयश भारतातील प्रत्येकाचे म्हणावे लागेल कारण आपण सगळे भारताचे नागरिक आहोत. आज सर्वत्र महाविद्यालयात जल्लोष झाला आणि हीच चर्चा सर्वांमध्ये होती. शास्त्रज्ञांनी केलेली कामगिरी खरोखर प्रेरणादायी आहे.