जळगाव- राय
सोनी इन्स्टिट्यूटमध्ये ‘टेक क्रंच-2014 अंतर्गत टेक्निकल मेगा इव्हेंट आणि ‘टीआरपीसीएस-2014’ पेपर प्रेझेंटेशन या दोन्ही राष्ट्रस्तरावरील स्पर्धांना शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतून चार हजारांहून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.
‘टेक क्रंच-2014 अंतर्गत रोबो रेस- आव्हानात्मक ट्रॅकवर रोबोंची शर्यत, रोबो वार- रोबोंचे युद्ध, रोबो सॉकर- रोबोंचा फुटबॉल, जंक यार्ड- टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे, मेगा ग्राफिक्स- इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढणे, सर्किट मेनिया- इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करणे, चॉप स्ट्रक्चर- आइसक्रीमच्या स्टिक्स वापरून पूल तयार करणे, पोस्टर प्रेझेंटेशन- तांत्रिक आणि अभियांत्रिकीच्या विविध विषयांवर पोस्टरचे सादरीकरण, सी क्वीझ- संगणकीय भाषेत प्रोग्रामिंग करणे,
गुगलिंग- दिलेल्या प्रश्नांचे संगणकावर इंटरनेटच्या साह्याने गुगल सर्च इंजिनवर एका सर्चने उत्तर शोधणे, लॅन गेमिंग- यात एनएफएस मोस्ट वॉंटेड (कार रेस) काउंटर स्ट्राइक (सैनिकी युद्ध) हे संगणकीय खेळ, बॉक्स क्रिकेट आय क्वीझ- सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे अशा एकूण १३ स्पर्धा होणार आहेत.
‘टीआरपीसीएस’ या पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत- कम्युनिकेशन सिस्टिम, वायरलेस नेटवर्क अॅण्ड इट्स सिक्युरिटी, व्हीएलएसआय अॅण्ड एम्बेडेड सिस्टिम, रोबोटिक्स अॅण्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन, नॅनो टेक्नॉलॉजी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅट्रॉनिक्स या आठ विषयांवर आधारित पेपर सादर करावयाचे आहेत. पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन गटांत या स्पर्धा होणार आहेत. या वेळी रेमंड लिमिटेड (जळगाव)चे कार्यकारी संचालक ए.एस.नागराजा, फाउंडेशन ब्रेक्स मॅन्युफॅक्चरिंग लि. (जळगाव)चे व्यवस्थापक योगेश फालक, रेक्झम कंपनी (मुंबई)चे मानव संसाधन विभागप्रमुख मंगेश चव्हाण, उमविचे कुलसचिव ए.एम.महाजन, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे उपाध्यक्ष अविनाश रायसोनी, कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, स्पर्धेचे व्यवस्थापक प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, रायसोनी व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धांच्या माहितीच्या संकेतस्थळाला ३३ हजार हिट्स मिळाल्या आहेत.