आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raymond Employee Salary Increment Issue IN Jalgaon

रेमण्डचा करार ‘कम्प्लीट’; पुढील आठवड्यात खात्यात जमा होणार सात कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘द कम्प्लीट मॅन’ अशी जाहिरात करणाऱ्या रेमण्ड कंपनीने वर्षभर ताटकळत राहिलेल्या कामगारांसोबत अखेर वेतनवाढीचा नवा करार केला आहे. जुन्या आणि नव्या कामगारांना साधारणत: ३० ते ५२ टक्के पगारवाढ मिळणार असून तांत्रिक प्रक्रिया पार पडताच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पुढील आठवड्यात कोटी ८५ लाख रुपये जमा होणार आहेत.
फरकाची एकरकमी रक्कम जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे.
नवीन कराराच्या मुद्यावरून वर्षभर रेमण्डमध्ये सुरू असलेली धुसफुस अखेर शांत झाली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत रेमण्डचे अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, उपाध्यक्ष हरीश चॅटर्जी, ए.एस. नागराजा, युनियन पदाधिकारी जितू जोशी, ललित कोल्हे, सुनील फालक, दिलीप महाजन, नवल पाटील, तुषार राणे, दिलीप वराडे, सुरेंद्र पाटील यांनी चर्चेअंती नवीन कराराच्या वाटाघाटी केल्या.
नवीन करारातील वाढीनंतर देशातील इतर टेक्स स्टाइल्स उद्योगांमधील कामगारांच्या तुलनेत रेमण्ड कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ झाल्याचा दावा रेमण्ड व्यवस्थापनाने केला आहे. नवीन करारानंतर कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या कराराचे स्वागत करत संघटनेच्या नावाखाली काम करता फिरणाऱ्यांना कामावर लावण्याची मागणी या वेळी कामगारांनी केली.
दिवाळी बोनसपेक्षा जास्त फरकाची रक्कम हाती पडल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे. सुमारे सात कोटी रुपये कामगारांच्या हाती पडल्यावर सहाजिकच बाजारपेठेवर याचा सकारात्मक परिणाम जाणवणार आहे.

कामगारांच्या हिताचा घेतला निर्णय

^नवीन करारासंदर्भात चर्चेच्या अनेक फैरी झाल्या. कामगारांचे हित लक्षात घेऊन जास्तीत जास्त पगारवाढ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर पुढील आठवड्यात कामगारांच्या खात्यात एकरकमी फरकाची रक्कम जमा होऊ शकणार आहे. ए.एस. नागराजा, कार्यकारी संचालक, रेमण्ड

करारातून जुन्या, नवीन कामगारांना दिलेला शब्द पाळला

^नवीन करारात घसघशीत वाढ झाल्याने कामगारांकडून याचे स्वागत झाले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना दिलेला शब्द आपण पाळला आहे. पहिल्या दिवशी सुमारे ८०० ते ८५० कामगारांनी नवीन कराराचे फॉर्म भरून दिले आहेत. आठवडाभरात फरकाची रक्कम वितरित होईल. कराराची घोषणा करतेवेळी कामगारांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या असून नेत्यांशी चर्चा करून तसे बदल केले जातील. ललितकोल्हे, प्रमुख सल्लागार, कामगार उत्कर्ष सभा

जुने कायम कामगार : रेमण्डमध्ये जुन्या कायम कामगारांची संख्या सुमारे ९५० आहे. त्यांना १० ते १४ हजार रुपयांपर्यंत वेतन होते. यात हजार ३०० रुपयांची वाढ हाेणार आहे. या कामगारांना जानेवारी २०१४ ते जानेवारी २०१५ अशा ११ महिन्यांचा फरकही मिळणार आहे. जुन्या कायम कामगारांच्या खात्यात प्रत्येकी ५५ हजार ९०० रुपये पडणार आहेत. एकूण ९५० कामगारांच्या खात्यात कोटी ३१ लाख हजार रुपये जमा होणार आहेत.

नवीन कायम कामगार : कंपनीत दोन-तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या नवीन कायम कामगारांची संख्या सुमारे ३५० आहे. या कामगारांना हजार ५०० रुपये वेतन आहे. नवीन करारानुसार त्यांना प्राेडक्शन अलाउंन्स हजार ४०० रुपये वाढ मिळणार आहे. ११ महिन्यांचा फरक म्हणून नवीन कायम कामगारांच्या खात्यात प्रत्येकी ४४ हजार २०० रुपये जमा होणार आहेत. ३५० कामगारांच्या खात्यात एकूण कोटी ५४ लाख ७० हजार रुपये जमा होतील.