आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायसाेनी फार्म हाऊसचे अतिक्रमण काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रशासकीय कारवाईला सहकार्य करत स्वत: अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शवलेल्या रायसाेनी फार्म हाऊसचे अतिक्रमण गुरुवारी पूर्णपणे काढण्यात अाले. दरम्यान, रायसाेनी यांच्यासह अानंद मल्हारा यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून घेत असल्याचे तहसीलदारांना लेखी जबाब दिला अाहे.

मेहरूण तलावावरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदार गाेविंद शिंदे यांच्या नेतृत्वात बुधवारी अतिक्रमण काढण्याची माेहीम हाती घेतली. त्यात प्रशासकीय कारवाईला सहकार्य करत अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शवली.
शेतजमीन अाणि माेकळ्या प्लाॅटचे तलावावरील अतिक्रमण प्रशासनाने काढले. प्लाॅटच्या सीमेवर टाकण्यात अालेल्या सिमेंटचे छाेटे अाेटे बुधवारीच जेसीबीने ताेडण्यात अाले होते. गुरुवारी अर्धवट राहिलेले अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात अाले. तलावाभाेवती असलेल्या अन्य अतिक्रमणासंदर्भात अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने हे अतिक्रमण काढण्यात अालेले नाही. न्यायालयाच्या अादेशानंतर अतिक्रमणासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार अाहे.