आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी नीलिमा धडपडतेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘वाचालतर वाचाल’ अशी म्हण असून तिचा प्रत्येकाने अवलंब करून आपले जीवन समृद्ध करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नीलिमा सोनवणे हिने पुढाकार घेतला आहे. यासाठी तिने सुधर्मा या सामाजिक संस्थेंतर्गत गेंदालाल मिलमध्ये बाल वाचनालय सुरू केले असून ती मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करीत आहे.

नूतन मराठा शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या नीलिमा सोनवणेचे कार्य हे खरच प्रेरणादायी अन् इतरांना आदर्शवत आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून गेंदालाल मिल परिसरातील मुलांना वाचन संस्कृतीबाबत मार्गदर्शन करीत आहे. दिवाळीत तिने सुधर्मा या सामाजिक संस्थेचे हेमंत बेलसरे यांच्या मार्गदर्शनाने बाल वाचनालय सुरू केले आहे. त्यामुळे नीलिमा आता ग्रंथपाल झाली आहे. बाल वाचनालयाच्या माध्यमातून ती झोपडपट्टी, गरीब वसाहतीतील मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करीत आहे. त्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत विविध गोष्टींची पुस्तके वाचायला देते. जवळपास ३५ मुले या उपक्रमात सहभागी झाली आहेत. वाचनालयात पुस्तकांमध्ये तिच्याकडे तेनालीराम, माकडाची गोष्ट, साने गुरुजींचे व्यक्तिमत्त्व, सरदार वल्लभभाई पटेल आदी पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकाची नोंद तीच ठेवते. एवढेच नव्हे तर मुलांचे पुस्तक वाचून झाल्यानंतर ती त्यांना त्या पुस्तकात काय चांगले आहे. यातून काय बोध घेतला, तुम्हाला काय शिकायला मिळाले याबाबत विचारणा करत असते. तिच्या या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा आहे.

घरचीपरिस्थिती हलाखीची : नीलिमालावडिलांचा आधार नाही. आई ही हॉस्पिटलमध्ये काम करते. एक भाऊ आणि दोन लहान बहिणी असा तिचा परिवार आहे. तिच्या घरची परिस्थिती ही खूपच हलाखीची आहे. पण डगमगता ती मोठ्या हिंमतीने संपूर्ण घराला आधार देते. तिला पोलिस खात्यात अधिकारी व्हायचे आहे.
पुस्तकांसोबत नीलिमा सोनवणे.

लिटील आयकॉन
वाचन केल्याने आपणास विविध गोष्टींचे ज्ञान मिळते. ्यासाठी प्रत्येकाने दररोज काहीतरी वाचत रहावे, असा सल्ला देत वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी गेंदालाल मिल परिसरातील नीलिमा सोनवणे धडपडतेय.