जळगाव - राज्यशासनाने रेडी रेकनर दरामध्ये टक्के वाढ केली असली तरीही घर घेताना जळगावकरांची बचतच होणार आहे. कारण रेडी रेकनरच्या दरात वाढ करतानाच दुसरीकडे आरसीसी बांधकामाचे मूल्यांकन मात्र प्रतिचौरस मीटरमागे सुमारे १३.६५ टक्क्यांनी घटवल्याने बिल्डरांना पर्यायाने नवे घर घेणाऱ्या ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे शुक्रवार, एप्रिलपासून राज्य शासनाने मालमत्ता मूल्यांकनात सरासरी टक्क्यांनी वाढ केली अाहे. पूर्वी संपूर्ण राज्यात सरसकट महापालिका, ग्रामीण, नगरपालिका अाणि प्रभाव क्षेत्र या विविध विभागांमध्ये राज्यभर दर जवळपास सारखेच असायचे. नाशिक, पुणे महापालिकेतील बांधकामाचे मूल्यांकन जळगाव शहरातही लागू हाेते. नवीन धाेरणानुसार जळगाव महापालिकेसाठी स्वतंत्र दर ठेवण्यात अाले अाहेत. शहरनिहाय निर्णय घेतल्यामुळे जळगाव शहर महापालिका हद्दीमध्ये बांधकामाचे दर प्रतिचाैरस मीटरसाठी २२ हजार रुपयांवरून १९ हजार करण्यात अाले अाहेत. त्यामुळे शहरवासीयांसाठी ही फायद्याची बाब आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दरवाढ कमी
^गेल्यावर्षीच्यातुलनेत यावर्षी दरवाढ कमी करण्यात अाली अाहे. त्यामुळे हा एक प्रकारचा दिलासाच म्हणावा लागेल. जळगाव जिल्ह्यात सरासरी टक्क्यांपर्यंत रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली अाहे. बांधकामाचे दर जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र देण्यात अाले अाहेत. जळगाव शहरात अारसीसी बांधकामाचे दर प्रतिचाैरस मीटरसाठी २२ हजारांवरून १९ हजार रुपये करण्यात अाले अाहेत. राजेंद्र पाटील, मुद्रांकजिल्हाधिकारी.
हे आहे उदाहरण
जळगाव शहरात २० लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मूल्यांकन टक्के वाढल्यामुळे फ्लॅटच्या खरेदीसाठी स्टॅम्प ड्यूटी नाेंदणी फीचे १० ते १२ हजार रुपये अधिक पडतील. तर दुसरीकडे बांधकामाचे दर कमी झाल्यामुळे २० लाख रुपयांच्या फ्लॅटच्या किमतीत हजार रुपये कमी हाेतील. त्यामुळे ग्राहकांवर मूल्यांकन दरवाढीचा बाेजा ते हजार रुपये एवढाच बाेजा पडणार आहे.
असा हाेईल फायदा
जळगाव महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षात अारसीसी बांधकामांचे मूल्यांकन २२ हजार रुपये प्रतिचाैरस मीटर हाेते. बांधकाम व्यावसायिकांना या मूल्यांकनाच्या टक्के म्हणजे २२० रुपये प्रतिचाैरस मीटर ‘लेबर सेस’ म्हणून शासनाला कर भरावा लागत हाेता. नवीन निर्णयानुसार हे मूल्यांकन १३.६५ टक्के घटवले. म्हणजेच २२ हजारांवरून १९ हजार रुपये करण्यात अाले अाहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना प्रतिचाैरस मीटरसाठी २२० रुपयांएेवजी १९० रुपये लेबर सेस भरावा लागणार अाहे. यात पूर्वीच्या तुलनेत बांधकाम व्यावसायिकांना प्रतिचाैरस मीटर ३० रुपयांचा फायदा हाेणार अाहे.
मूल्यांकनात सरासरी वाढ
नगरपालिकाक्षेत्र टक्के
ग्रामीण क्षेत्र टक्के
महापालिका क्षेत्र ४.७१ टक्के
प्रभाव क्षेत्र टक्के
जिल्हा सरासरी ५.७६ टक्के
असे घटले अारसीसी बांधकाम दर
जळगावशहर १९ हजार रुपये (पूर्वी २२ हजार)
ग्रामीण भाग हजार ३२० रुपये (पूर्वी हजार)
नगरपालिका क्षेत्र १७ हजार १०० रुपये (पूर्वी १७ हजार ६००)
^पूर्वी मुंबई,पुणे या शहराच्या बराेबरीने जळगावचे बांधकामाचे दर हाेते. नवीन निर्णयानुसार हे दर हजार रुपयांनी कमी केले अाहेत. याचा फायदा ग्राहकांनाही हाेईल. २२ हजारांवरील दर १९ हजार रुपये करण्यात अाले अाहेत. हे दर प्रतिचाैरस मीटरसाठी १५ हजार रुपये करावेत, अशी अामची अपेक्षा हाेती. शासनाने यावर्षी जास्तीची वाढ करता टक्केच मूल्यांकन वाढवल्याचा काही प्रमाणात दिलासा मिळणार अाहे. दरवाढ कमी असल्याने ग्राहकांनाही त्याचा फायदा हाेईल. अनिश शहा, अध्यक्ष,क्रेडाई जळगाव.