आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल इस्टेट रेडिरेकनर दरात १० टक्के वाढ; बांधकामाचे दरदेखील वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्यातील मूल्यांकन म्हणजेच रेडिरेकनरचे दर सरासरी १४ टक्के वाढले आहेत. शहरात पालिका हद्दीसह ग्रामीण भागात ही वाढ सरासरी १० टक्के आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत महसूल वाढेल. मात्र, हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांना १० टक्के अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. रेडिरेकनरच्या नियमांना डावलून होणारे व्यवहार आणि बांधकामाचे दर देखील महागण्याची शक्यता आहे.

भुसावळ शहर तालुक्यात बांधकाम क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. याचे परिणाम जमीन आणि प्लॉटच्या खरेदीवर झाले आहेत. आता जानेवारीपासून लागू झालेल्या रेडिरेकनरच्या वाढीव दरांचा परिणामदेखील व्यवहारांवर होणार आहे. शहरातील लोकसंख्येची घनता आणि होणाऱ्या व्यवहारांतून निघालेल्या निष्कर्षान्वये विविध सर्व्हे क्रमांकानुसार ही दरवाढ झाली आहे. शहरात रेडिरेकनरच्या दरापेक्षा स्थानिक व्यवहारांच्या किमती जास्त आहेत. मात्र, या दरामंध्ये वाढ झाल्याने स्थानिक पातळीवरील परस्परांचे व्यवहार महागणार आहेत.

गतवर्षीपेक्षा वाढ कमी :शहरात गेल्या वर्षी रेडिरेकनरचे दर २५ टक्के वाढले होते. यंदा केवळ १० ते १२.३३ टक्के वाढ झाली आहे. यामुळे जमीन, प्लॉट, फ्लॅट खरेदीला वाव असेल. यामुळे परस्पर व्यवहारातील किमतीवर मात्र परिणाम होणार नाही.

रेडिरेकनर दरवाढीचा प्रत्यक्ष व्यवहारांवर परिणाम होणार नाही. घर, जमीन खरेदी करताना किमतीपेक्षा सुख-सुविधा आणि चांगल्या भागाला पसंती दिली जाते दिलीपपाटील संचालक,पाटील-महाजन कंपनी

शहरातील बहुतांश सर्व्हेमध्ये सरासरी १० ते १२ टक्के वाढ झाली आहे. यामुळे महसुलात भर पडेल. मात्र, व्यवहारांवर परिणाम होणार नाही. डी.एस.चव्हाण,प्रभारीसह.दुय्यम निबंधक

अशी होते वाढ
- सामान्य व्यवहार आणि अशिकृत बाजारभाव यामुळे एका पातळीवर येण्यास मदत होते.
- शहरातील कोणत्या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे हा निकषदेखील महत्त्वाचा ठरतो.
- स्थानिक बदल यासह विविध माध्यमांमधून येणाऱ्या जमिनींच्या किमतींचा अभ्यास केला जातो.
- रेडिरेकनरचे दर निश्चित करताना गेल्या वर्षभरात झालेले व्यवहार महत्त्वाचे ठरतात.
जामनेर रोड : जामनेर,शिवपूर कन्हाळे रोड, जळगाव रोडचा विस्तारित भाग, साकेगाव
घनता : लोकसंख्येचीजास्त घनता असलेल्या शहराच्या उत्तर भागात रेडिरेकनरचे भाव सर्व्हेनुसार १० ते १२.३३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. याचाही परिणाम जाणवेल.
बजेट वाढणार : पालिकाहद्द आणि हद्दीबाहेरील दरांमध्ये १० ते १२ टक्के वाढ झाली. मात्र, रेडिरेकनरच्या बांधकामाचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.
ग्रामीण भागाला फायदा
रेडिरेकनरचे दर वाढल्याने शहराच्या तिन्ही बाजूंनी पालिका हद्दीत जागांची विक्री वाढेल. त्यामुळे शहराचा विस्तार होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील एनए शेतजमिनीचा भाव वाढेल, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.