आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यातील तरुणाचा कथित पुनर्जन्म; ओम शांती केंद्राचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा (जि. जळगाव) - शहरातील रिक्षाचालक अनिल चौधरी यांचा भाऊ सुनीलचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर गावात एका बालकाच्या रूपात त्याचा पुनर्जन्म झाल्याचा दावा माऊंटअाबू व पारोळा येथील ओम शांती केंद्राच्या प्रमुखांनी केला अाहे.

या बालकाला पाराेळ्यात अाणल्यानंतर त्याने आई-भावासह बहिणीलाही ओळखले. या मुलाला पाहण्यासाठी गावात माेठी गर्दी जमली हाेती. दरम्यान, पुनर्जन्म हा वादग्रस्त विषय असून यास शास्त्रीय पुरावा नाही. आता हा प्रकार कितपत खरा समजावा? हा प्रश्न अाहे. त्यामुळे आता यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पारोळा येथील ओम शांती केंद्राच्या प्रमुख संध्या दीदी व सदस्य अनिल चौधरी यांनी सांगितले की, ‘सुनील हा धार्मिक वृत्तीचा होता. तो वयाच्या १७व्या वर्षी पारोळा येथून ओम शांती केंद्रात सेवेकरी झाला. वयाच्या ३३व्या वर्षी म्हणजेच सन २००८मध्ये त्याचा मृत्यू झाला हाेता. कार्तिकेयच्या रुपाने उत्तर प्रदेशात अाता त्याचाच पुनर्जन्म झाला अाहे.’

कार्तिकेयला पाहण्यास नागरिकांची गर्दी
अनिल चौधरी व त्यांची आई माऊंटआबू येथे गेले असता, कार्तिकेयने त्यांना ओळखत मिठी मारली. यानंतर चौधरी यांनी सिंग दांपत्यास पारोळा येथे २४ जून राेजी अाणले. या बालकास बघण्यासाठी गर्दी उसळली. याबाबत कळताच खासदार ए.टी.पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनीही या बालकाची भेट घेऊन त्यास अनेक प्रश्न विचारले. ओम शांती केंद्रातर्फे या बालकाची बग्गीवरुन मिरवणूक काढण्यात आली.
पुनर्जन्माची अशीही कथा
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील शिवप्रताप सिंग व नीलम सिंग या दांपत्यास सहा वर्षांपूर्वी मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी ‘कार्तिकेय’ ठेवले. तो वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच धार्मिक कार्यात रमायला लागला. अात्मा, कल्याण असे शब्द ताे वारंवार उच्चारत असे. त्यामुळे पालक हैराण झाले. त्यांनी कार्तिकेयला आर्ट ऑफ लिव्हिंग या केंद्रात नेले. परंतु, तेथेही या बालकाचे निदान झाले नाही. माऊंटआबू येथील केंद्रात नेल्यानंतर मात्र तो तिथे प्रसन्न मुद्रेने वावरू लागला. त्याने कथित पूर्व जन्मातील आई-वडिलांसह, इतर घडामोडी केंद्राच्या प्रमुखांना सांगितल्या. ‘पूर्व जन्मातील आई-वडील हे जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आहेत. अापला मृत्यू कसा व कुठे झाला’, असेही अनेक विषय त्याने सांगितले. त्यामुळे तेथील केंद्र प्रमुखांनी पारोळा येथील सेवेकरी सुनील चौधरी याचा पुनर्जन्म झाल्याचे मान्य केले. याबाबत त्यांनी पारोळा येथील मृत सुनीलच्या आई व भाऊ यांना माहिती दिली. तसेच त्यांना माऊंटआबू येथे बोलावून घेतले.
बातम्या आणखी आहेत...