आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recent Advances In Chemo And Bio Sciences Conference At Jalgaon

‘मूजे’तील परिषदेत २३ व्याख्याने, ७५ पाेस्टर्स सादर,२५० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मूळजी जेठा महाविद्यालयात सुरू असलेल्या "रिसेंट अॅडव्हान्सेस इन केमो अॅण्ड बायोसायन्सेस' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. यात २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर २३ निमंत्रित वक्त्यांची व्याख्याने ७५ पोस्टर्स सादर झालीत. समारोपावेळी डॉ. अलका व्यास प्रमुख पाहुण्या होत्या. अध्यक्षस्थानी ज्योत्स्ना बेंडाळे होत्या. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, डॉ. जी.एस.चौधरी उपस्थित होते.

पीकलागवडीवरील प्रभाव
चौथ्यासत्रात डॉ. नीलेश तेली यांनी "पीक संवर्धनासाठी माती परीक्षणाचे फायदे अन्नद्रव्यांचे महत्त्व' या विषयावर आढावा घेतला. यात त्यांनी भौतिक रासायनिक पीक लागवडीवरील प्रभाव जैविक रासायनिक खतांचा योग्य वापर करून वनस्पतींसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करता येईल, याबद्दल माहिती दिली. डॉ. हरीश व्यास (उज्जैन) यांनी जैविक यंत्रणेच्या कचरा व्यवस्थापनातील योगदान अपारंपरिक ऊर्जा पर्यायी व्यवस्था म्हणून सूक्ष्म जीवांचा वापर करून ऊर्जानिर्मिती जलशुद्धीकरण या विषयाबद्दल माहिती दिली.

डीएनएबारकोडिंगची माहिती
पाचव्यासत्रात डॉ. जी.डी.खेडकर यांनी डीएनए बारकोडिंगचा वनस्पती प्राणीशास्त्रातील विविध प्रजातींची ओळख करून घेण्यासाठी करण्यात येणारा वापर भेसळ ओळखण्यातील महत्त्व सांगितले. डॉ. बी.एल.चौधरी यांनी क्रायसोबॅक्टेरिअम ग्लेअम या प्रजातीतील विकारांचा कॅरेटिन या प्रथिनांच्या विल्हेवाटीतील योगदान या विषयावर चर्चा केली. अंतिम सत्रात डॉ. नंदकुमार मोरे (लखनऊ) यांनी प्लास्टिक वापराचा अन्नावर होणारा परिणाम या विषयावर माहिती दिली. पोस्टर परीक्षण डॉ. के.पी.नारखेडे, डॉ. भास्कर मोरे, डॉ. दीपक नारखेडे यासह डॉ.राजोश्री बॅनर्जी, प्रा. एम.पी.बाउस्कर यांनी केले. समारोपावेळी डॉ. व्ही.एस.झोपे यांनी प्रास्तविक केले.

पोस्टर प्रेझेंटेशनचा निकाल
बेस्टपोस्टर इन केमिस्ट्री- प्रथममाधुरी सुरतकर, द्वितीय वैष्णवी सूर्यवंशी. बेस्टपोस्टर इन झुलॉजी - दीपिकापाटील, बेस्टपोस्टर इन बायोटेक्नॉलॉजी - अर्पिताहलदारे, अर्पणा रॉय.

मौखिकसादरीकरण
बेस्टपेपर इन केमिस्ट्री- गुणवंतसोनवणे, बेस्टपेपर झुलॉजी- जे.व्ही.पाटील,बेस्टपेपर इन बायोटेक्नॉलॉजी- पूजावर्मा