आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिचार्ज करून वापरा प्रिपेड लॅण्डलाइन फोन, बीएसएनएलची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे घरांमधील कमी होत असलेली लॅण्डलाइन टेलिफोनची संख्या वाढावी, यासाठी बीएसएनएल कंपनीने सिम कार्ड असलेला, रिचार्ज करून वापरता येणारा लॅण्डलाइन टेलिफोन बाजारात आणला आहे. सहज घराबाहेर, शेतात, प्रवासात अथवा कुठेही घेऊन जाता येणाऱ्या या वायरलेस टेलिफोनला (एडब्ल्यूपी) ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

घरातील टेलिफोनची क्रेझ कमी झाली असून गेल्या पाच वर्षांत नवीन टेलिफोन कनेक्शन घेण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. तसेच मोबाइलमुळे कित्येक वर्षांपासून सुरू असलेले टेलिफोन कनेक्शन जमा करण्याचेही प्रमाण वाढले अाहे. यावर कंपनीने ग्राहकांना सिम कार्ड असलेला विना कनेक्शनचा टेलिफोन उपलब्ध करून दिला आहे. नेहमीच्या टेलिफोनप्रमाणेच याची रचना आहे. यात कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड टाकून याचा कुठेही वापर करता येणार आहे. घरात मोबाइलचा वापर करता येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उत्कृष्ट ठरली असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएसएनएलकंपनीकडे हजार २० रुपये भरून फोन जीएसएम सिम कार्ड, चार्जर, चार सेल दिले जातात. १० आकडी फोन नंबरद्वारे कुठेही कॉल करता येणे शक्य असून यात इनकमिंग फ्री आहे. आऊटगोईंगसाठी सहा महिन्यांसाठी किमान १२५ रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. यात ३७ रुपयांचे टॉकटाइम मिळणार आहे.
बीएसएनएल वायरलेस फोन.

विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट प्लॅन कार्यान्वित
कृषीकार्डाप्रमाणेच एक जीबी इंटरनेटची सुविधा देणारा स्टुडंट प्लॅनही कंपनीने आणला आहे. हा प्लॅन केवळ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांसाठी असल्याचेही बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.