आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recipient Week To Refrain Warning Administration

हप्तेखोरांना आवर घाला-प्रशासनाला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-पालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागातील काही कर्मचारी व्यापार्‍यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून हप्ते वसूल करीत आहेत. या हप्तेखोरांना आवरा अन्यथा व्यापारीच संबंधितांना रंगेहाथ पकडून देतील, असा इशारा समन्वय समिती सभेत व्यापारी प्रतिनिधींनी दिला आहे.
महापौरांच्या दालनात महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी समन्वय समितीच्या बैठक झाली. यावेळी उपमहापौर सुनील महाजन, उपायुक्त प्रदीप जगताप, सहायक आयुक्त उदय पाटील, अधीक्षक सतीश शुक्ल, समन्वय समिती सदस्य पुरुषोत्तम टावरी, राजकुमार अडवाणी, प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, मुकेश लोटवाला उपस्थित होते. प्रशासनाने ट्रान्सपोर्टमधून येणार्‍या मालावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांकडून व्यापार्‍यांना कायद्याचा धाक दाखवत हप्ते वसुली केली जाते. उपमहापौर महाजन यांनी सांगितले की, उपायुक्त प्रदीप जगताप आणि उदय पाटील यांची नावे पुढे करीत कर्मचारी हप्ते वसुली करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
यावर उपायुक्तांनी नावे जाहीर करण्याची मागणी केली. यावर पुरुषोत्तम टावरी यांनी सांगितले की, माझ्या एका मित्राकडून एका कर्मचार्‍याने सुरुवातीला 2 हजार मागणी केली, नंतर आयुक्तांना द्यावे लागतील असे सांगत आकडा 10 हजार केला. हप्तेखोरांना आवरले नाही तर व्यापारीच संबंधितांना रंगेहाथ पकडून देतील. तसेच या विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या सहा महिन्यात करण्यात याव्या त्यामुळे लाचखोरीला पायबंद बसेल.
मूल्यांकनात व्याज आकारणीला विरोध
प्रशासनातर्फे 2010-11 व 2011-12 या आर्थिक वर्षातील करआकारणीचे मूल्यांकन सुरू आहे. यात काही त्रुटी आढळून आल्यास संबंधित व्यापार्‍यांकडून दरमहा 2 टक्के या प्रमाणे व्याज आकारणी केली जात आहे. कर लागू झाल्यावर सुरुवातीला काही चुका होऊ शकतात, त्यामुळे व्याजआकारणी करू नये, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली होती. यासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांकडे ठेवण्यात आला असल्याचे उपायुक्त प्रदीप जगताप यांनी स्पष्ट केले.