आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादिवासी याेजनांमध्ये दुरुस्तीसाठी शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अनुसूचित जमाती कल्याण कमिटीकडे राज्यभरातून अनेक सूचना अाल्या अाहेत. या सूचनांमधून अनुसूचित जमातीच्या याेजनांमध्ये बदल करण्याची गरज स्पष्ट झाली अाहे. त्यामुळे या संदर्भात राज्य शासनाला दुरुस्ती उपाययाेजना सुचवल्या अाहेत. त्याचा अहवालदेखील शासनाला दिला अाहे. अशी माहिती राज्य समितीचे अध्यक्ष अामदार रूपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली.

अनुसूचित जमाती कल्याण समिती जळगाव जिल्हा दाैऱ्यावर अाहे. पत्रकारांशी बाेलताना अध्यक्ष अामदार रूपेश म्हात्रे यांनी समितीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या समस्यांवर अभ्यास सुरू असून त्यात बदलाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या वेळी अामदार प्रा. चंद्रकांत साेनवणे उपस्थित हाेते.