आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्यांचा होणार पर्दाफाश; महापालिका जाहीर करणार 73 थकबाकीदारांची यादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आर्थिक कुचंबणेत अडकलेल्या महापालिकेने आता कोणत्याही परिस्थितीत करवसुली करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील एक लाखापेक्षा जास्त कराची रक्कम थकविणार्‍या बड्या चेहर्‍यांचा पर्दाफाश केला जाणार आहे. कर बुडवणार्‍या बड्या 73 व्यक्तींची नावे व पत्ते जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झालेल्या महापालिका प्रशासनाला दैनंदिन कामकाज करणेही अवघड झाले आहे. उत्पन्नाच्या सातपट जास्त महापालिकेची थकबाकी येणे आहे. मालमत्ताकराच्या वसुलीत प्रशासन कमी पडत असल्याची टीका नेहमीच होत आली आहे. त्यामुळे आता शहरातील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. मंगळवारी या यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला आहे. एक लाखापेक्षा जास्त व चार लाखांपेक्षा कमी रक्कम न भरता उलट पालिकेच्या जप्तीच्या नोटीसला न जुमानणार्‍या बड्या हस्तींचे चेहरे उघड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

बदनामीची भीती सतावतेय
महापालिकेने यापूर्वीही अनेकदा थकबाकीदारांची नावे जाहीर करून कडक धोरण अवलंबले होते. परंतु त्या थकबाकीदारांकडे वेगवेगळ्या रकमा होत्या. पहिल्यांदाच एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची नावे वर्तमानपत्रातून जाहीर होणार असल्याने यापूर्वीच्या सूचनांना न जुमानणार्‍या थकबाकीदारांच्या मनात बदनामी होईल या विचाराने धडकी भरली आहे. अनेकांनी महापालिकेतील अधिकार्‍यांना फोन करून माहिती जाणून घेण्याचा प्रय} केला.

शासकीय कार्यालय वगळले
शहरातील चारही प्रभागांतर्गत ज्या मालमत्ताधारकांकडे थकबाकीची मोठी रक्कम अडकून पडली आहे. अशा थकबाकीदारांकडून रक्कम सक्तीने वसूल करण्याच्यादृष्टीने कडक पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत थकबाकीदारांचे काही एक ऐकून घेतले जाणार नाही. मात्र, यातून शहरातील सर्व शासकीय कार्यालय वगळण्यात आली आहेत.