आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Red Cross Give To Workers Firstaid Training Issue At Jalgaon, Divya Marathi

रेडक्रॉस देणार कामगारांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- इंडियन रेडक्रॉस सोसायटीची स्थापना 18 जुलै 1953मध्ये झाली. 7 मे रोजी 152वा रेडक्रॉसदिन साजरा केला जाणार आहे. याच दिवशी थॅलेसेमिया दिनही साजरा केला जाणार आहे. रक्तसंकलनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून रेडक्रॉस सोसायटीने आपला आलेख उंचावला आहे. त्याही पुढे जाऊन जास्तीत जास्त लोकांना अपघातानंतर काय प्रथमोपचार केले पाहिजे याविषयी माहिती व्हावी म्हणून प्रशिक्षण हाती घेण्यात येणार आहे. अनेक अपघातांमध्ये रुग्णांना वेळीच प्रथमोपचार मिळत नाही म्हणून अनेक रुग्ण दगावल्याचे निष्पन्न झाले आहे. रेडक्रॉस सोसायटीने डॉ. विजय चौधरी, डॉ. शांताराम नारखेडे, डॉ. प्रकाश महाजन यांनी पुणे येथे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्यामार्फत 11 मे रोजी जळगाव शहरातील कंपन्यांमधील कामगारांना, एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापुढील टप्प्यात मुंबई येथील पथक प्रशिक्षणासाठी येणार आहे.
‘माय रेडक्रॉस स्टोरी’ घोषवाक्य
‘माय रेडक्रॉस स्टोरी’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. त्यानुसार चालू वर्षात रेडक्रॉस सोसायटी काम करणार आहे. स्वयंसेवक आणि रक्तदाते आणि अन्य संबंधित यंत्रणेची नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रय} यामाध्यमातून केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 100हून अधिकवेळा रक्तदान करणार्‍या व 50हून अधिक वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचा गौरव रेडक्रॉसतर्फे केला जाणार आहे.
150 मुलांना मोफत पिशव्या
थॅलेसेमिया व सिकलसेलच्या मुलांना मोफत रक्तपुरवठा करून रेडक्रॉस समाजसेवेचं व्रत जोपासत आहे. महिन्याला जवळपास 150 मुलांना रक्त पिशव्या उपलब्ध करून दिल्या जातात. शहरासह जिल्ह्यात या आजाराचे 150पेक्षा अधिक रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णांचे जगण्याचे वय कमी दिसून येते. मात्र, मुंबईत थॅलेसेमिया असतानाही श्रीमती ठक्कर या महिलेने वयाची 44 वर्षे गाठले आहे. त्यांनाही यानिमित्ताने जळगाव येथे बोलावण्यात आले आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने उन्हाळ्यात जाणवणारी रक्ताची टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. रेडक्रॉसच्या नवीन घोषवाक्याप्रमाणे रक्तदाते आणि स्वयंसेवी संस्थांचा गौरव यंदा केला जाणार आहे. यापुढे रक्तदान करणार्‍या रक्तदात्याला ‘बॅच’ दिला जाणार आहे. डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी