आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंटणखाना प्रकरण : 500 पानी दोषारोपपत्र; संशयितांमध्ये डॉक्टर अन् अधिकारीसुद्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नगाव येथील कुंटणखानाप्रकरणी धुळे न्यायालयात सुमारे पाचशे पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यात सात जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले असून, 12 जण फरार दर्शविण्यात आले आहेत. 12 पैकी गणेश चौधरीला अटक झाली असून, उर्वरित 11 जणांमध्ये दोन महिलांसह डॉक्टर व शासकीय अधिकार्‍याचा समावेश आहे.

कुंटणखानाप्रकरणी पीडित चौदावर्षीय मुलीने तक्रार दिल्यावर पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी धुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामध्ये बेबीबाई चौधरी, सचिन अग्रवाल, सपना पाटील, पूजा पाटील, विजय टाटिया, अशोक बाफना आणि कविता कातकाडे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पाचशे पानांच्या या दोषारोपपत्रात आवश्यक पुरावे आणि माहिती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्यामुळे दोषारोपपत्राच्या पानांची संख्या सुमारे 14 हजारांपर्यंत गेली आहे. दरम्यान, न्या. एम. एम. अग्रवाल यांच्या समक्ष दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र लॉ अँण्ड जस्टिस विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. यासोबत हा खटला लढण्यासाठी धुळयातील दोन प्रख्यात वकिलांची नावेही पाठविण्यात आली. गृह मंत्रालयाकडून वकिलाचे नाव निश्चित झाल्यावर खटल्याचे कामकाज सुरू होईल.

11 जण फरार - फरार असलेल्या 11 संशयितांमध्ये बाबा, हसन, सुषमा, जया, नाना, जितू, विनोद तसेच धुळयातील एका हॉटेलमालकाचा समावेश आहे. याशिवाय संजय बोरसे, फरहान नामक तरुण आणि अनिल पवार यांचीही नावे असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यापैकी हसन हा मुंबईत अवैधरीत्या मुलींची विक्री करतो. नाना हा डॉक्टर तर विनोद शासकीय अधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.