आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरचीचे दर निम्म्याने घटले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बाजारपेठेत सर्वच गोष्टींचे दर वाढत असल्याने हैराण झालेल्या गृहिणींना लाल मिरची यंदा दिलासा देणार आहे. गेल्यावर्षी लाल मिरचीचे प्रतिकिलो 180 रुपयांपर्यंत गेलेले दर यंदा 50 ते 70 रुपयांच्यादरम्यान असल्याने मसालेदार आणि चटपटीत खाणा-यांना दिलासा मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात स्थानिक पातळी आणि औरंगाबाद, मलकापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शेलवड अशा विविध भागातून मिरची येत असते. गेल्यावर्षी सर्वच ठिकाणी उत्पादन घटल्यामुळे चपाटा, रसगुल्ला व अन्य नवीन प्रजातींच्या मिरचीचे भाव 100 ते 180 रुपये किलोवर गेले होते. यंदा मात्र भाव आवाक्यात असल्याने साठवणूक करणे सर्वसामान्यांनाही परवडणार आहे. लाल मिरचीच्या सुमारे 150 पेक्षा अधिक जाती आहेत. यापैकी बॅडगी, तेजा, 334, सी-5, सनम, फाफडा, चपाटा, दीपिका, बर्ड साय, गावरान, शिमला या जातींना अधिक पसंती दिली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिरचीला चांगली मागणी असते. भावही चांगला मिळत असल्याने भारत जगातील मोठा मिरची उत्पादक व निर्यातदार मानला जातो. आपल्याकडून पाकिस्तान,
बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, सिंगापूर आदी देशांमध्ये येथून माल निर्यात होतो.
महाराष्ट्रात मिरचीचे उत्पादन मोजक्या प्रमाणात आहे. नंदुरबार भागात मिरची वाळविताना मोठमोठे ढिगा-यांचे दृश्य पाहून येथे सर्वाधिक उत्पादन होत असल्याचा समज अनेकांचा होतो. दक्षिणेकडील गुंटूर येथे दर दिवसाला 40 ते 50 किलोचे एक ते सव्वालाख पोते दररोज बाजारपेठेत दाखल होतात.