आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जकातप्रश्नी धुळे मनपाला न्यायालयाची नोटीस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या स्थायी समितीने जकात ठेक्याचा विषय त्यातील त्रुटी दर्शवत नामंजूर केला होता. त्याविरोधात श्री कृष्ण खांडसरीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात खंडपीठाने महापालिकेला नोटीस दिली असून, सोमवारी (दि.22) म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेला जकात वसुलीसाठी अपेक्षित रक्कम देणारा ठेकेदार न मिळाल्याने गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेचे कर्मचारी वसुली करत आहेत. जकातीचा ठेका देण्यासाठी महापालिकेतर्फे अनेकदा निविदा काढण्यात आली. जकात वसुलीसाठी कमी रकमेची निविदा आल्याने महापालिकेने हा विषय मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यावर शासनाने स्थायी समितीनेच निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत जकातीची किमान देकार रक्कम 69 कोटी 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर जकात ठेका देण्यासाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार र्शीकृष्ण खांडसरी यांनी निगोसिएशनअंती 69 कोटी 25 लाख रुपयांना जकातीचा ठेका घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्रुटींमुळे जकात वसुलीचा विषय नामंजूर करण्यात आला होता. त्याविरोधात र्शीकृष्ण खांडसरीतर्फे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर म्हणणे सादर करण्यासाठी खंडपीठाने महापालिकेला नोटीस दिली असून सोमवारी (दि.22) ठेक्यासंदर्भात म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.