आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीत टॅबवर होणार आधार नोंदणी, लाख ६२ हजार विद्यार्थ्यांची होणार नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सध्या जिल्हाभरातील ते वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील लाख ७२ हजार शहरातील ९० हजार अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३६ आधार नोंदणीचे किट उपलब्ध करून दिले आहे. तरी देखील नोंदणी प्रकियेत अडचणी येत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून ३० टॅब देण्यात येणार आहेत. येत्या आठवड्याभरात हे टॅब उपलब्ध होणार आहे.

जिल्हाभरात आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी ३६ किट उपलब्ध आहेत. त्यातही हे किट अंगणवाडीमध्ये आधार नोंदणी करीत असल्यामुळे इतर ठिकाणी नोंदणी करण्यास अडचण येते. जिल्ह्यासाठी नव्याने १५० किटची मागणी करण्यात आली आहे. तर अंगणवाडीमध्ये वापरले जाणारे किटदेखील नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. अंगणवाडीतील किट काढून घेतल्यास तेथे गैरसोय होऊ नये म्हणून अंगणवाडीसाठी टॅबची व्यवस्था करण्यात येत आहे. अंगणवाडी विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करताना हाताचे पंजे किंवा आय स्कॅनरची गरज भासत नाही. केवळ फोटो आणि इतर माहिती भरली जात असल्याने हे काम टॅबवर देखील करणे शक्य असल्याने टॅबची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाभरात आतापर्यंत अंगणवाडीच्या ८० हजार विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यात आली आहे.

जप्तकिटची मान्यता रद्द करणार
तहसीलदारांनीगोलाणी मार्केटमध्ये जप्त केलेल्या आधार नोंदणी किटसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या किटची मान्यताच रद्द करण्यासंदर्भात शासनाकडे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जप्त केलेल्या आधार नोंदणी किट यापुढे उपयोगात येऊ शकणार नसल्याची शक्यता आहे.

२०० किटची गरज
जिल्ह्यातील२०११च्या जनगणनेनुसार ८५ टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. गेल्या पाच वर्षांत दरवर्षी टक्के वाढ झाल्याने नव्याने शाळेत दाखल झालेल्या ३० टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नाही. त्यासाठी विद्यार्थी आणि उर्वरित नागरिक यांची आधार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्याला २०० आधार नोंदणी किटची आवश्यकता आहे. पण प्रशासनाकडे फक्त ३६ किट उपलब्ध असल्याने गोंधळ उडाला आहे.