आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यांमधील दृढविश्वासासाठी ‘प्रॉमिस-डे’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-‘व्हॅलेंटाइन डे’ सप्ताहात मंगळवारी ‘प्रॉमिस-डे’ साजरा होणार आहे. मैत्री, प्रियकर, पती-पत्‍नी, व्यावसायिक सर्वच नात्यांमध्ये वचनाला महत्त्व आहे. ‘प्रॉमिस डे’च्या निमित्ताने केवळ प्रियकर, प्रेयसी यांनीच एकमेकांना वचन देणे एवढाच अर्थ नसून प्रत्येक नात्यात एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी वचन देण्याची गरज असते. एकमेकांच्या मनात स्वत:बद्दल दृढ विश्वास निर्माण करणे, आपण समोरच्या व्यक्तीसोबत असल्याची जाणीव त्याच्या मनात दृढ व्हावी या साठी त्याला आवश्यक असलेल्या बाबतीत वचन देऊन आश्वासित करण्याचा हा दिवस आहे.
या दिवसाच्या निमित्ताने एकमेकांना अधिक समजून घेण्याची एक संधी त्यांना लाभणार आहे. पती-पत्‍नी एकमेकांच्या अडचणी, आनंद ओळखून त्यांना हव्या त्या गोष्टींसाठी वचनबद्ध होऊन आश्वासित करणे असे या दिवसाचे महत्त्व आहे.
मित्र-मैत्रिणी
शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक आयुष्यातही मित्र-मैत्रिणींची साथ एकमेकांना मिळत असते. आजच्या दिवशी आयुष्यभर एकमेकांसोबत राहून मदत करण्याचे वचन देऊ शकतात. त्यामुळे मैत्री अधिक घट्ट होण्यास मदत होते. मैत्रीत ‘धन्यवाद’, ‘माफ करा’ या सारख्या शब्दांना जागा नसते. मात्र मित्रांच्या गरजा ओळखून संकटात त्यांची मदत करण्याला वचनबद्ध होण्यासाठी हा ‘प्रॉमिस-डे’(वचन दिवस) फायदेशीर ठरतो.
व्यावसायिक
व्यवसायात वचनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. उत्तम व्यवहार चालविण्यासाठी व्यावसायिकांनी एकमेकांना दिलेली वचने पाळणे हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो.व्यवसायात आपल्यापेक्षा लहान किंवा मोठय़ांना आलेल्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबद्दल त्यांना आश्वासित करण्याची संधी आज व्यावसायिकांना मिळणार आहे.