आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फोर-जी’च्या पैशांचा वापर विकासकामांसाठी, महापालिकेला तीन काेटी निधी प्राप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रिलायन्स इन्फाेकाॅमतर्फे शहरात फाेर-जी केबल टाकण्याचे काम सुरू अाहे. दाेन टप्प्यात सुरू असलेल्या १०० िकलाेमीटर रस्त्यावरील खाेदकामासाठी सुमारे काेटींचा निधी पालिकेच्या तिजाेरीत जमा केला. मात्र, पालिकेची हुशारी म्हणजे खाेदकाम केलेल्या रस्त्याची दुरुस्ती करता त्यातून नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यात अाले. तिजाेरीत खडखडाट असलेल्या पालिकेसाठी फाेर-जीचा पैसा म्हणजे िवकासकामांसाठी एक संधीच मानली जात अाहे.
इंटरनेट दूरक्षेत्रातील गतिमानता वाढवण्यासाठी शहरात रिलायन्स जी.अाे.इन्फाेकाॅम िलमिटेड या कंपनीने शहरात सुमारे १०० किमी अंतरावर भूमिगत केबल टाकण्यास सुरुवात केली अाहे. महापालिकेकडे गेल्या वर्षी घेतलेल्या परवानगीनुसार दाेन टप्प्यात ७४.९२५ िकमी २६.१५७ िकमी अंतरावर काम सुरू अाहे. यासाठी मक्तेदाराने प्रस्तावित नकाशानुसार संबंधित युनिट इंजिनिअरमार्फत स्थळ िनरीक्षण अहवाल िमळवून परवानगी िदली. कंपनीनेही त्यानुसार काम सुरू केले अाहे. मात्र, अनेक ठिकाणी केबल टाकल्यानंतर त्या िठकाणी रस्त्यावरील जमीन लेव्हल करण्याचा िवसर मक्तेदाराला पडताे. त्यामुळे चांगले रस्ते खराब हाेण्याचे प्रकार सातत्याने घडत अाहेत. फाेर-जी केबल टाकण्याची अत्यावश्यक सेवा असली तरी त्यासाठी पालिकेने कंपनीला काही सूचना देऊन सभागृहात रस्त्यांच्या भवितव्यासाठी धाेरणात्मक निर्णय घेण्याची गरज अाहे.

धाेरण ठरवणे गरजेचे
याचसंदर्भात महासभेतही चर्चा झाली हाेती. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी कंपनीने संबंधित प्रभागातील उपअभियंत्यांच्या उपस्थितीत काम करणे गरजेचे अाहे. त्यामुळे महापालिकेच्या जलवाहिनीचे नुकसान टळेल. तसेच खाेदकामानंतर हाेणारी दुरुस्ती यावर पालिकेचे िनयंत्रण राहील. तसेच ज्या रस्त्यांचे डांबरीकरण करायचे अाहे, त्या रस्त्यांना अाधी प्राधान्य देणे गरजेचे अाहे. खाविअाचे नेते नितीन लढ्ढा यांच्या मते नवीन रस्त्याचे डांबरीकरण चारी बुजवून केलेली दुरुस्ती यात बराच फरक असताे. त्यामुळे अशा कामांवर पालिकेचे लक्ष असणे गरजेचे अाहे. यासाठी सभागृहाने काहीतरी धाेरण निश्चित करायला हवे.

पालिकेच्या तिजाेरीत काेटी
रिलायन्सकंपनीने महापालिका क्षेत्रात चारी खाेदकाम करण्यासाठी परवानगी मागून दाेन टप्प्यात सुमारे काेटी ४३ लाख ९६ हजार २६० रुपये ४४ लाख ४६ हजार ८५५ रुपये, असा काेटी ८८ लाख ४३ हजार ११५ रुपयांचा िनधी पालिकेच्या तिजाेरीत जमा केला अाहे. या निधीतून ज्या मार्गावर खाेदकाम केले त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करून वाहतुकीस अडचण हाेणार नाही, अशी व्यवस्था करणे अपेक्षित अाहे. परंतु पालिकेने रिलायन्सकडून मिळालेला पैसा ही एक संधी मानून खाेदकाम केलेल्या रस्त्यांकडे सर्रास दुर्लक्ष करत नवीन रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली अाहे.