आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौपदरीकरणाबाबत बैठक, महामार्गावरील अतिक्रमण 10 दिवसांत काढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६च्या जळगाव हद्दीत संयुक्त मोहीम राबवून सीमांकन हद्द निश्चिती करून १० दिवसांत अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांसह महापौर नितीन लढ्ढा, पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, उपमहापौर ललित कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, भूमी अभिलेख अधीक्षक महेश खडतरे, नगरसेवक अमर जैन उपस्थित होते. याप्रसंगी महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत सद्य:स्थिती मांडण्यात आली.

समांतररस्त्यांबाबत मनपा देणार ‘नही’ला पत्र
राष्ट्रीयमहामार्गालगत समांतर रस्त्याचे काम मनपा करणार की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण? असा प्रश्न होता. याबाबत मनपा आयुक्त जीवन सोनवणे महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, तत्कालीन मनपा आयुक्तांनी १७ जानेवारी २०१० रोजी मंत्रालय न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून समांतर रस्त्याचे काम करण्यास मनपा सक्षम नसल्याचे मुलाच्या आठवणीने राजपूत कुटुंबीय गहिवरले
महामार्गावरील अपघाताने लाडका हिरावून नेला
महामार्गावर झालेल्या अपघातात आमचा लाडका मुलगा हरपला आहे. मुलगा रविराज गेल्याच्या यातना आम्ही दोन वर्षांपासून भोगत आहाेत. आता कोणत्याही कुटुंबासोबत असा प्रकार घडू नये. असे दु:ख कोणाच्याच वाट्याला येऊ नये, अशा शब्दात गोपालसिंग राजपूत यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच ‘दिव्य मराठी’ने राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी घेतलेल्या ‘ड्राइव्ह’चे काैतुक करीत मी व्यक्तिश: त्यात सहभागी आहे, असे सांगून चांगल्या अभियानाला पाठिंबा दिला.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १५ डिसेंबर २०१४च्या मध्यरात्री गोपालसिंग राजपूत यांचा मुलगा रविराज याचा शिव कॉलनीजवळ महामार्गावर अपघात झाला. रविराज हे शासनाच्या इरिगेशन विभागात डेप्यूटी इंजिनिअर म्हणून नोकरीस होते. वयाच्या २४व्या वर्षी उच्च शिक्षण घेत एमपीएससी परीक्षेतून ते या पदावर पोहोचले होते. अवघ्या महिनाभरावर लग्न येऊन ठेपलेले असताना रविराज यांना अपघातात जीव गमवावा लागला. कुटुंबात सर्वत्र आनंदाचे
सांगतनकार दिलेला आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने समांतर रस्त्याचे काम करू शकत नाही. समांतर रस्त्यांची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नही’कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने हे काम करावे, असे आयुक्तांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक काळे यांनी सांगितले की, समांतर रस्त्याचे काम करू शकत नसल्याबाबत मनपाने ‘नही’ला लेखी द्यावे. त्यांचे म्हणणे मंत्रालयाला सादर करून पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर समांतर रस्त्यांबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे मनपा ‘नही’ला पत्र देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

चौपदीकरणाचा मुहूर्त जानेवारीत
चिखलीते तरसोद हे काम विश्वराज इंफ्रास्ट्रक्चर तरसोद ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जेबीएल इंफ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. चौपदरीकरणासाठी ९४ टक्के भूसंपादन झालेले आहे. पैसे वाटपही सुरू आहेत. जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. महामार्गावरील खड्डे बुजवणे साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याबाबत १० दिवसांचा ड्राइव्ह राबवण्यात येणार असल्याची माहिती ‘नही’चे प्रकल्प संचालक काळे यांनी दिली.

खड्डेबुजवण्यात निष्काळजीपणा केला..
आमदार,महापौर, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सर्वपक्षीय सदस्य, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्यासह मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात तातडीने बैठक घेऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना रात्री निवेदनही दिले होते.

त्यापाठोपाठ मंगळवारी दबाव गटाचे सदस्य गजानन मालपुरे, डॉ. राधेश्याम चौधरी, विनोद देशमुख, जमील देशपांडे, अमित जगताप, कुलभूषण पाटील, मंगला बारी, संदीप सूर्यवंशी, तेजस जोशी, प्रीतम नारखेडे, मितेश गुजर, जयेश शिसोदे, अनिल एम.सोनार, आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. महामार्गावरील खड्ड्यांमुळे गेल्या वर्षभरात सुमारे दीडशेवर बळी गेले आहेत. एखादी घटना घडल्यास रस्त्याचे थातूरमातूर काम करून खड्डे बुजवण्याचे काम उरकले जाते. तेथे पुन्हा खड्डे पडतात, त्यामुळे नाहक बळी जात आहेत. याबाबत प्रशासन ठोस कार्यवाही करीत नाही. याला जबाबदार कोण? असा जाब दबावगटातील सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. जळगावकरांना चांगले रस्ते लाभावेत यासाठी ‘दिव्य मराठी ’तसेच आम्ही शहरवासीयांची बाजू मांडत आहोत, असे सांगून प्रशासन काम करीत असल्यास एवढे दिवस हा प्रश्न प्रलंबित का? असा सवालही केला. या वेळी दबावगटाच्या सदस्यांना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मीदेखील जळगावचीच रहिवासी आहे. जळगावकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे सांगून खड्डे बुजवण्याची जबाबदारी वास्तविक महामार्ग प्राधिकरणाची आहे. खड्डे बुजवण्याबाबत निष्काळजीपणा होत असल्यास त्याला प्राधिकरणच जबाबदार अाहे. हे प्राधिकरण केंद्र शासनाच्या अखत्यारित येते, असे सांगून यापुढे महामार्गावर खड्डे बुजवल्यास अपघात घडत राहिल्यास प्राधिकरणाविरोधात कारवाई करावी, असे निर्देश आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

महामार्गावरील अपघाताने लाडका...
वातावरणहाेते लग्नाची तयारी सुरू होती. कुलदेवी बिजासनीमातेचे दर्शन घेऊन पत्रिका वाटण्यासाठी त्यांनी १५ डिसेंबर रोजी सुटी घेतली होती. त्यानंतर चारचाकीढवाहनाने ते नांदुरा येथून जळगावी आले. घरापासून काही अंतरावर असतानाच शिव कॉलनीजवळ त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी कुटुंबीयांनी मोठ्या दु:खाने सहन केली. मंगळवारी मयत रविराज यांचे वडील गोपालसिंग राजपूत यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत श्रावण बाळ हरपल्याचे उद््गार काढले. रविराज हा लहानपणापासून शिक्षणात अव्वल. कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. आई-वडिलांची सेवा करावी, या उद्देशाने तो अभ्यास संपवताच नोकरीला लागला. नोकरी लागल्यानंतर दोन वर्षांनी लग्न ठरले. अचानकच त्याच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली. एकुलता मुलगा गमावल्यामुळे आता आयुष्यभर त्याच्या आठवणींच्या सहाऱ्याने आम्हाला जगायचे आहे, असे ते म्हणाले.
खोटेनगर स्टॉपजवळ महामार्गाची पाहणी करताना ‘नही’चे अरविंद काळे, नगरसेवक अमर जैन, मनपा अभियंता सुनील भोळे.
शहरवासीयांच्या दबाव गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अरुंदरस्ता, खचलेल्या साइडपट्ट्या अाणि खड्ड्यांमुळे जीवघेणा झालेला राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येबाबत मंगळवारी शहरवासीयांच्या दबावगटाने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन चर्चा केली. महामार्गाची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली असून जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल दबावगटातील सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरवासीयांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गालगतचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळा करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. महामार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत निष्काळजीपणा केल्यास आणि यापुढेही अपघात घडल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (नही) जबाबदार धरावे, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांना सांगितले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गेल्या १० दिवसांत झालेल्या तीन भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर जीवघेण्या महामार्गाच्या उग्र समस्येकडे शहरवासीयांचे लक्ष वेधण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने खास ड्राइव्ह हाती घेतला आहे. या ड्राइव्ह अंतर्गत ‘राष्ट्रीय महामार्गावर अडीच लाख जळगावकरांचा दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास, प्रशासन ढिम्मच’ अशा आशयाचे वृत्त सोमवारी प्रकाशित होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत खळबळ उडाली. महामार्ग समस्येवर जागरूक नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दबावगट निर्माण करावा, असे आवाहनही ‘दिव्य मराठी’ ने केले होते. त्यानुसार सोमवारी शहराचे दोन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देताना विनोद देशमुख, गजानन मालपुरे, डॉ. राधेश्याम चौधरी, कुलभूषण पाटील, अमित जगताप, जमील देशपांडे, मंगला बारी आदी.
जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला
रस्त्यावरीलखड्डे बुजवणे साइड पट्ट्यांच्या कामासाठी प्राप्त निधीतून झालेल्या कामांचा प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नही’च्या प्रकल्प संचालकांना दिल्या. जळगाव महानगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या जागेची संयुक्त पाहणी करून महामार्गाच्या हद्दीचे सीमांकन करावे नंतर महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सीमांकनचे संयुक्त काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मनपा आणि भूमी अभिलेख कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे.
कचरा डम्प करणाऱ्यांवर गुन्हे
महामार्गालगतमोठ्या प्रमाणावर कचरा जुने बांधकामे, पाडलेले मटेरियल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. महामार्गावरील रहदारीच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक कुटुंबांतील दिवे विझताहेत
जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी
शहरातूनजाणारा हा महामार्ग आता धोक्याची घंटा बनला आहे. दिवसेंदिवस तेथे अपघातांची संख्या वाढते आहे. यात अनेक कुटुंबांतील दिवे विझत आहेत. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चौपदरीकरण करणे, अपघातमुक्त महामार्ग तयार करणे, समांतर रस्त्यासाठी ‘दिव्य मराठी’ने घेतलेल्या ‘ड्राइव्ह’मध्ये आमचे कुटुंबीय सहभागी आहोत, अशा भावना राजपूत यांनी व्यक्त केल्या.
बातम्या आणखी आहेत...