आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reprieval In Jalgaon Municipal Corporation Of Action

भाजीपाला विक्रेत्यांची याचिका फेटाळली, महापालिकेच्या कारवाईला फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी केली नसल्याने, आहे त्या जागेवर व्यवसाय करू देण्याची विक्रेत्यांची याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळल्यावर मात्र पुढील न्यायालयीन लढ्यासाठी मुदत मिळावी, असा अर्ज विक्रेत्यांनी केल्याने न्या. कविता शिरभाते यांनी पालिकेच्या कारवाईस फेब्रुवारीपर्यंत स्थगिती वाढवून दिली आहे.
प्रमुख रस्त्यांवर भाजीपाला, फळ तसेच इतर विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अशा विक्रेत्यांना हटवण्यासंदर्भात पालिकेने हालचाली सुरू केल्या हाेत्या. भाजीपाला फळ विक्रेत्यांना गाेलाणी मार्केटमध्ये स्थलांतरीत होण्यासाठी पालिकेने १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली हाेती. मात्र त्याला प्रतिसाद देता, आहे त्याच जागेवर व्यवसाय करू देण्याच्या मागणीसाठी २७५ विक्रेत्यांनी १२ डिसेंबर राेजी न्यायालयात अपील दाखल केले हाेते. या प्रकरणी न्यायालयात पाचवेळा सुनावणी हाेऊन दाेन्ही बाजूचे म्हणणे एेकून घेतले गेले.

अखेर शनिवारी िनकाल देताना प्रमुख रस्ते रहदारीसाठी माेकळे करण्याचा पालिकेचा हेतू लक्षात घेता, न्या. शिरभाते यांनी िवक्रेत्यांची याचिका फेटाळून लावली अाहे. हा िनकाल जाहीर झाल्यावर िवक्रेत्यांनी जिल्हा न्यायालयात अपिलात जाण्यासाठी संधी िमळावी, असा अर्ज दाखल केला. हा अर्ज स्वीकारून पालिकेने अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला िदलेली स्थगिती त्यांनी फेब्रुवारीपर्यंत वाढवली अाहे. पालिकेतर्फे अॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. िवक्रेत्यांची बाजू अॅड. प्रदीप कुलकर्णी यांनी मांडली.
इच्छुकांसाठी सहकार्य
न्यायालयाने भाजीपाला विक्रेत्यांचे अपील फेटाळून लावले आहे. मात्र, त्यांना नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार अपिलासाठी संधी मिळाली आहे. त्यांना अजिबात व्यवसाय करू देणे, अशी अामची भूमिका नाही. न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून काहीजण मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास इच्छुक असतील तर प्रशासन सहकार्य करेल. प्रदीपजगताप, उपायुक्त