आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांसह लेझीम, बँण्ड, परेड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरणाचे कार्यक्रमही घेण्यात आले. काही शाळांत ‘बेटी बचाओ’, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’विषयी संदेश देण्यात आला.
दिगंबर जैन ग्रुप : प्रदीप जैन यांनी ध्वजवंदन केले. सचिव रेखा छाबडा यांनी मंगलचरण म्हटले. अंतरा व सुहाना जैन यांनी नृत्य सादर केले. संस्थापक अध्यक्ष पी.सी.पाटनी यांनी ‘वाढती लोकसंख्या व खराब अर्थव्यवस्था’, ‘बेटी बचाओ’ यावर माहिती दिली. पूनमचंद छाबडा, संजय चांदीवाल, रितेश गांधी, प्रीतेश चोरडिया, आशा सालेचा, कल्पना जैन, संजय महाजन उपस्थित होते.
स्वरवेध : काव्यरत्नावली चौकात स्वरवेध व संस्कारभारती आणि जैन मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे भारतमाता पूजनाचा कार्यक्रम झाला. उद्योगपती अशोक जैन, प्रा.शरदचंद्र छापेकर, प्रा.संजय पत्की यांनी ध्वजवंदन केले. किशोर सुर्वे, भागवत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. संजय सोनवणे, सुरेंद्र वाघ, राहुल महिरे, अप्पा नेवे यांनी साथसंगीत केली. लिमजी जलगाववाला, वंदना मुळे, विराज कावडिया, सुहास देशपांडे, सुनंदा सुर्वे यांनी नियोजन केले.
टेलिकॉम रिक्रिएशन क्लब : बीएसएनएलच्या मुख्य इमारतीवर उपमहाप्रबंधक साकेतकुमार वर्मा यांनी ध्वजवंदन केले. या वेळी प्रश्नमंजूषा, राष्ट्रभक्तीपर गीत सादर झाली. टीआरसी सेक्रेटरी सी.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा होमगार्ड कार्यालय : अप्पर पोलिस अधीक्षक आर.एस.तडवी यांनी ध्वजवंदन केले. द्वितीय समादेशक डी.एल.गवळी, प्रशासकीय अधिकारी डॉ.आर.व्ही.भालोदे, अँड.एच.ए.मुदलीयार, पलटन नायक विलास पाटील, समादेशक अधिकारी एस.डी.बागूल, केंद्रनायक आर.जी.सांबर, माजी होमगार्ड अधिकारी अशोक माळी, निर्देशक जी.डी.महाजन, एम.जे.नन्नवरे, लिपिक एम.टी.पाटील, के.यु.मोरे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघ : चैतन्यनगरातील ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष दतात्रय चौधरी यांनी ध्वजवंदन केले. व्ही.आर.पाटील, भीमराव मराठे, मंदाकिनी महाजन, स्मिता लढ्ढा, ल.व.बोंडे, जी.जी.चौधरी यांनी गीते सादर केली.
ललित कला भवन : कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवनात मंडळाच्या सदस्या सकिना तडवी यांनी ध्वजवंदन केले. महाबीज मंडळाचे सहायक क्षेत्र विकास अधिकारी प्रकाश वानखेडे, इकबाल तडवी, शैलजा करोड, किशोर तळेले, दतात्रय बेलदार, शिवदास शिंपी उपस्थित होते. या वेळी डॉ.प्रदीप कुमार यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. मनोज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
रायसोनी विद्यालय : अयोध्यानगरातील बीयूएन रायसोनी इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे चेअरमन शिरीष रायसोनी , प्राचार्य दत्ता देसले, मुख्याध्यापिका नलिनी शर्मा यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बोकाळलेल्या आतंकवादावर गांधीविचारांची गरज, महिलांवर अत्याचार करणार्यांना फाशीची शिक्षा, अशा विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
जिल्हा परिषद विद्यानिकेतन : जिल्हापरिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी ध्वजवंदन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.डी.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, राजेंद्र महाजन उपस्थित होते. एम.बी.पाटील यांनी स्काउट पथकाचे ध्वजसंचलन केले. एस.एम.बर्हाटे यांनी माहिती दिली. सुनील बी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
महाराणा प्रताप विद्यालय : डॉ.प्रमोद खिवसरा यांनी ध्वजवंदन केले. शालेय समिती सदस्य सुरेश लोढा, मुख्याध्यापिका हेमलता नेरपगार, डी.एस.पाटील, पर्यवेक्षक एस.ई. निकम उपस्थित होते. स्त्रीभ्रूणहत्येसंबंधीचे पत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
सिद्धि विनायक विद्यालय : विद्यालयात पत्रकार प्रमोद बर्हाटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जयेश कामानी, संस्थाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
विद्या इंग्लिश मीडियम : शशी बियाणी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. चौथीचा विद्यार्थी चेतन माळी याने या दिवसाचे महत्त्व सांगितले. ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर कार्यक्र सादर करण्यात आले.
इकरा उर्दू हायस्कूल : डॉ.चंद्रशेखर सिकची यांनी ध्वजवंदन केले. डॉ.योगेश चौधरी, संस्थेचे अध्यक्ष अ.करीम सालार, मनोज मुणोजी, मदनलाल छाजेड, समीर रोकडे, गनी मेमन, डॉ.ताहेर शेख, सगीरसेठ बागवान उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ.शेख बशीर यांनी परिचय करून दिला. यानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
पालिकेत कर्मचार्यांचा गौरव : जळगाव महापालिकेत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, महापौर जयर्शी धांडे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी उपमहापौर राखी सोनवणे, उपायुक्त भालचंद्र बेहरे, नगरसेवक उपस्थित होते. या वेळी उत्कृष्ट सेवा केलेल्या गणेश सोनार, लक्ष्मण सपकाळे, अरुण पाचपांडे, सतीश शुक्ल, त्र्यंबक कुलकर्णी, प्रकाश सोनवणे, त्र्यंबक तापडे, सुजाता पाटील, संजय वैद्य, दीपक फुलमोगरे, भागवत पाटील, सुहास कोल्हे, आदी कर्मचार्यांचा पालिका कामगार युनियनतर्फे गौरव करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे या वेळी उपस्थित होते. जयहिंद गृप, खान्देश सेंट्रल या ठिकाणीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
या ठिकाणीही साजरा झाला कार्यक्रम : शहरातील झिपरू अण्णा बालविहार विद्यालय, नाजिम मलिक उर्दू प्रायमरी स्कूल, इकरा रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, प्रगती शिक्षण मंडळ संचलित नवीन माध्यमिक विद्यालय, मानवसेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, आझाद एकता बहुउद्देशीय संस्था, शिवकॉलनीतील लीलाई मुलांचे बालगृह, अलफैज उर्दू हायस्कूल, र्शीसाई पूर्व प्राथमिक विद्यालय, पी.ई.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बाहेती महाविद्यालय, साईनाथ फाउंडेशन, एसटी महामंडळ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.