आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आले देशप्रेमाचे उधाण, शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव शहरात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. त्यामुळे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था महिला मंडळांतर्फे विविध देशभक्तीपर, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. काव्यरत्नावली चौकातील कार्यक्रमासह विविध शाळांमध्येही देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम सादर झाले. त्यातच प्रजासत्ताकदिनी विवाहबद्ध झालेल्या एका नवपरिणीत दाम्पत्यानेही विवाहापूर्वीच ध्वजारोहण करून आपल्या देशप्रेमाची प्रचिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी साजिद पठाण, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जळगावशहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा नीलिमा संत यांनी ध्वजारोहण केले. या वेळी उपवनसंरक्षक यू.जी. कडलग, जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी किसन मुळे, महिला बालविकास अधिकारी राऊत आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

रायसोनी इन्स्टिट्यूट
जी.एच.रायसोनीअभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात विशाल पाटील रायसोनी पॉलिटेक्निक येथे अमेय यादव या टॉपर आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी आनंद रायसोनी, अजित रायसोनी, कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, प्राचार्य तुषार पाटील,संदीप यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.संजय जाधव श्वेता यादव यांनी केले.

रोटरीक्लब गोल्ड सिटी
क्लबतर्फेलाठी शाळेत आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी अध्यक्षा प्रीती मंडोरे, सचिव प्रवेश मुंदडा, सूर्यकिरण वाघण्णा, सुनील मिलवाणी, आर.एन.कुळकर्णी, अमित भुतडा, डॉ. सुभाष वडोदकर, मेहुल त्रिवेदी, मीनल मुणोत, कोमल मिलवाणी, तृप्ती त्रिवेदी, आरती कुलकर्णी, अश्विनी मुंदडा, माया रूपकाळे, मुख्याध्यापिका मालती बेंडाळे आदी उपस्थित होते.