आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात रेस्क्यू सेंटर आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवारात २८ जुनला बिबट्याचे नवजात बछडे सापडले होते. या पिलाचा सांभाळ करण्यासाठी वन्यप्रेमी पुढे आले नसते, तर वनविभागाची फजिती उडाली असती. भविष्यातही असा प्रसंगी उद््भवू शकतो. त्यादृष्टीने वन्यप्राण्यांवर उपचार, त्यांचा सांभाळ करण्यासाठी जिल्ह्यात रेस्क्यू सेंटर (वन्यप्राणी आधार केंद्र)ची नितांत गरज आहे.

यावल अभयारण्य, प्रादेशिक वनविभाग असा एवढा मोठा आवाका असूनही जळगाव जिल्ह्यात जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी एकही केंद्र नाही. वनविभाग याविषयी फारसा गंभीर नसल्याने तसे प्रयत्नही झाले नाहीत. मात्र, वेल्हाळेत आढळलेल्या बिबट्याच्या बछड्यावरून हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील अनुभवी आणि वन्यजीवांविषयी आस्था असलेल्या स्वयंसेवकांनी नवजात बछड्याचे सलग तीन दिवस योग्य संगोपन केले. दुसरीकडे त्याच्या आईचा (मादी बिबट्या) शोध घेण्यास वनविभागाला अपयश आले. भविष्यात अशा नाजूक प्रसंगी वन्यजीवांचे योग्य पालनपोषण, उपचारासाठी रेस्क्यू सेंटर उभारण्यास वनविभागालादेखील दिलासा मिळू शकतो.
मोठे वनक्षेत्र, विपुल संख्येने वन्यप्राणी; सेंटरची गरज आहेच
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या विपुल आहे. एवढ्या मोठ्या भागासाठी रेस्क्यू सेंटर व्हावे. यासाठी आम्ही वनसंरक्षकांकडे (वन्यजीव) मागणी करणार आहोत. प्रत्येक वेळी जखमी प्राण्याला घेऊन लांब प्रवास करणे शक्य होत नाही. विवेकदेसाई, वन्यजीव अभ्यासक, जळगाव

पाचहीजिल्ह्यांमध्ये वन्यप्राण्यांची संख्या चांगली असूनही कुठेही रेस्क्यू सेंटर नाही. यामुळे जखमी प्राण्यांना माणिकडोह (जुन्नर), बोरीवली नॅशनल पार्क येथे पाठवावे लागते. येथे आधीच गर्दी असल्याने वन्यप्राण्यांवर वेळीच उपचार होत नाही. त्यांच्या जीवावर बेतू शकते. राजेशठोंबरे, मानद वन्यजीव संरक्षक, जळगाव

तज्ज्ञांचा सहभाग असलेली रेस्क्यू टीम आणि रेस्क्यू सेंटरची जिल्ह्यात खरोखर गरज आहे. त्यादृष्टीने आमचे वरिष्ठ जळगाव उपवनसंरक्षकांनी प्रयत्न चालवले आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत यावर प्राथमिक चर्चा झाली होती. ठोस कृतीदेखील होईल. रेवती कुलकर्णी, सहायक वनसंरक्षक, जळगाव प्रादेशिक
रेस्क्यूटीमच्या संकल्पनेचे स्वागत असून यापूर्वी आम्ही रेस्क्यू सेंटरची मागणीदेखील केली आहे. तसेच नीलगाय, हरीण, नाग, अजगर, शृंगी घुबड, घोणस, धामण, माकड आदी जखमी प्राण्यांवर उपचारदेखील केलेले आहेत. सेंटरमुळे तत्काळ उपचार करता येतील. सतीशकांबळे, सर्पमित्र तथा उपाध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था
नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे परवानगी अर्ज रवाना
मादी बिबट्या शोधण्यास वनविभागाला अपयश आले आहे. यानंतर या िबबट्याच्या नवजात बछड्याच्या संगोपनाचा प्रश्न गुंतागुंतीचा होऊ शकतो. त्यापूर्वीच त्याची योग्य ठिकाणी रवानगी करण्यासाठी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे परवानगी मागण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच िबबट्याच्या बछड्याची राष्ट्रीय उद्यान किंवा प्राणी संग्रहालयात रवानगी होईल. याबाबत अधिकृत विचारणा करण्यासाठी जळगावचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद िदला नाही.