आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात एससी, तर दोन प्रभाग एसटी जागांसाठी होणार राखीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिका निवडणुकीसाठी शनिवारी (दि.२) प्रारूप प्रभागरचना जाहीर करणे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होईल. त्यात ४८ पैकी सहा किंवा सात जागा एससी, तर दोन किंवा तीन जागा एसटीसाठी राखीव होऊ शकतात. १३ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर उर्वरित २६ जागा सर्वसामान्य गटासाठी राहतील. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या पुढील व्यूहरचनेला वेग येईल.
सद्य:स्थितीत शहरात लाख ८७ हजार ५४० मतदार असून, त्यात एससी मतदार सुमारे २८ हजार आहेत. यामुळे सहा किंवा सात जागा एससी (अनुसूचित जाती), तर दोन किंवा तीन जागा एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गासाठी राखीव राहतील. एससी प्रवर्गातील लोकसंख्या प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, १२, १६ १८मध्ये जास्त आहे. परिणामी, या प्रभागांत एससी प्रवर्गातील आरक्षण जाहीर होऊ शकते, तर लोकसंख्येच्या आधारावर आणि हे दोन्ही प्रभाग एसटीसाठी आरक्षित होऊ शकतात.

प्रभाग क्रमांक एकमध्ये दोन्ही जागांवर आरक्षण टाकल्यास प्रभाग क्रमांक सातमधून एससी, तर प्रभाग २४मधून एसटीचे आरक्षण जाहीर होऊ शकते. असे झाल्यास याचा फटका विद्यमान नगरसेवक इच्छुकांना बसेल. प्रभाग क्रमांक चारमधून यापूर्वी परीक्षित बऱ्हाटे, १६मधून निर्मल कोठारी, मनोहर बारसे, पुरुषोत्तम नारखेडे कविता अशोक चौधरी हे निवडून आले आहेत. या प्रभागातील एक जागा एससी राखीव होण्याचे संकेत आहेत. यामुळे बारसे वगळता तिन्ही नगरसेवकांना फटका बसेल.

प्रभाग १२मध्ये एक जागा एससी राखीव राहणार असल्याने विद्यमान नगरसेविका नंदा प्रकाश निकम या सुरक्षित असल्या तरी, त्यांच्याच पक्षातील इतर तीन नगरसेवकांमध्ये उमेदवारीसाठी चुरस दिसेल. प्रभाग १८ देखील एससी राखीव होणार असल्याने राष्ट्रवादीच्या तेथील पुष्पा कैलास चौधरी, विजय चौधरी, मुश्ताक शेख उमेश नेमाडे यांची डोकेदुखी वाढेल. काहींना सोईनुसार प्रभाग बदलावे लागतील.

असाहोऊ शकतो संभाव्य बदल
अनुसूचित जमातीचे प्रभाग एकमध्ये सर्वाधिक ६५१ मतदार असल्याने हा प्रभाग राखीव होऊ शकतो. मात्र, एससी प्रवर्गाचेही १२९९ मतदार येथे आहेत. दोन्हींपैकी एकाच जागेवर आरक्षण देणे शक्य आहे. तसेच याखालोखाल मतदान असलेल्या प्रभाग २४मध्ये एसटी लोकसंख्या ५१३ असल्याने हा प्रभागही एसटी राखीव होऊ शकतो किंवा एससी जागेत बदल केल्यास प्रभाग क्रमांक १३ मध्ये १२७५ लोकसंख्या असल्याने हा प्रभाग एससी होण्याची दाट शक्यता आहे. अारक्षण साेडतीनंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान हाेऊ शकतात.

लोक नियुक्त आरक्षण सोडत
प्रभागांच्या आरक्षण सोडतीचे चित्र शनिवारी स्पष्ट होईल. यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षपदाकडे लक्ष असेल. तूर्त हे पद एससी संवर्गासाठी राखीव होण्याचे संकेत आहेत. मात्र, भुसावळ विधानसभा मतदारसंघ वरणगाव पालिकेचे नगराध्यक्षपदही एससी राखीव असल्याने तिसऱ्या मोठ्या जागेवरही एससी आरक्षण ठेवता येईल काय? हा तांत्रिक मुद्दा आहे.

२६ जागा सर्वसाधारण : २६जागा सर्वसाधारण राहणार अाहेत. त्यापैकी १३ महिला राखीव असतील. एससी घटकांतील सातमधील तीन किंवा चार, तर ओबीसीमधील १३ पैकी सहा ते सात जागा ओबीसी राखीव राहतील. ४८ जागांपैकी ५० टक्के म्हणजेच २४ जागा महिलांसाठी राखीव राहतील. यात सर्व प्रवर्ग सर्वसाधारण जागांचा समावेश राहील.
-----------------------
बातम्या आणखी आहेत...