आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reserve Bank Give Scholarship For Economics Research

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थशास्त्रात संशाेधन करण्यासाठी रिझर्व्ह बँक देणार शिष्यवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाविद्यालये अाणि विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्रात पारंगत असलेल्यांना प्राेत्साहन देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक अाॅफ इंडियाने घेतला अाहे. अशा प्राध्यापकांना दरमहा २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, संबंधितांकडून तसे प्रस्ताव मागवण्यात अाले अाहेत. प्रस्ताव सादर करणा-यांमधील ५ जणांना तीन महिन्यांसाठी ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार अाहे.

अार्थिक धाेरणनिश्चितीत महत्त्वाची भूमिका असलेल्या रिझर्व्ह बंॅकेच्या कार्याची माहिती अर्थशास्त्राशी संबंधित विद्यार्थी अाणि शिक्षकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी हे पाऊल उचलले जात अाहे. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी संबंधितांना अापला बायाेडाटा अाणि शाेधपत्र ‘दि डायरेक्टर- रिसर्च ग्रुप, डिपार्टमेंट अाॅफ इकाॅनाॅमी अॅण्ड पाॅलिसी रिसर्च’ यांच्याकडे पाठवावे लागणार अाहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासाेबत शिक्षकांना अापला बायाेडाटा अाणि शाेधपत्रदेखील पाठवावे लागणार अाहे. त्यासाठी वयाेमर्यादा ५५ वर्षे ठरवून देण्यात अाली अाहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी केल्यावर शिष्यवृत्ती दिली जाणार अाहे.