आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेपत्ता सुरक्षारक्षकाचे अवशेष सापडले; जैन फार्म फ्रेशच्या गाेदामात घेतला शोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल पाटील - Divya Marathi
अनिल पाटील

जळगाव- जैन फार्म फ्रेश फूड्सच्या जळीत गोदामाच्या ठिकाणी शोध पथकाला जळालेल्या अवस्थेतील घड्याळ, कपडे काही अवशेष रविवारी सायंकाळी आढळून आले. हे अवशेष बेपत्ता सुरक्षारक्षक अनिल पाटील यांचे असावेत, अशी शक्यता एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली. घटनास्थळी सापडलेले घड्याळ अनिल पाटील यांचे असल्याची पुष्टी या वेळी कंपनीत उपस्थित नातेवाइकांनीही दिली. मिळालेले अवशेष पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतले पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, गाेदामातील आग पूर्णतः आटोक्यात आल्याचे जैन फार्म फ्रेश फुड्सच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


शुक्रवारी जैन फार्म फ्रेश फुड्स लि.च्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी हजारो सहकारी एकजुटीने कामाला लागले होते. दरम्यान, १८ रोजी दुपारी कंपनीचे सुरक्षारक्षक अनिल पाटील यांच्या कुटुंबीयांनी पाटील घरी आल्याचा प्रशासनाला फोन केला पाटील कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांत हरवल्याची सायंकाळी नोंदही केली. वेअर हाऊसमध्ये कार्यरत असणारे, फायरसेफ्टी, इलेक्ट्रिक सुरक्षा विभागातील सर्व ११ सहकारी सुरक्षित आहेत. अनिल पाटील घरी पोहोचले नाहीत, असा फोन आल्यानंतर ते या वेअर हाऊस परिसरात असू शकतील ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी शनिवार दुपारपासून रविवार सायंकाळपर्यंत जळालेल्या वेअर हाऊस भागात कंपनी व्यवस्थापनाच्या निगराणीत शोध कार्य सुरू होते. कंपनीतील सहकाऱ्यांना शोधकार्यात मदत करण्यासाठी त्यांचे नातेवाईक सहभागी होते, असे जैन कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...