आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Resignation Drama Take New Shape In Maharashtra Navnirman Sena

राजीनामानाट्याने मनसेत राजकारण पेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती निवडीवरून मनसेत गटबाजीचे राजकारण सुरू झाले आहे. गैरहजर राहून व्हीप नाकारणाऱ्या नगरसेविका मंगला चौधरींवर अपात्रतेच्या कारवाईसाठी पक्षाकडून सुरुवात झाली आहे. चौधरींनीदेखील समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वादावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पक्षांतर्गत पुन्हा धुसफुस सुरू झाली असून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे.

महिला बालकल्याण समिती सभापती निवडीदरम्यान मनसेच्या नगरसेविका मंगला संजय चौधरींनी सभेला गैरहजर राहून पक्षाविरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन मंगला चौधरी, मिलिंद कोंडू सपकाळे नितीन नन्नवरे यांना पक्षाचे दरवाजे बंद केल्याची घोषणा केली होती. परंतु दोनच दिवसांत नन्नवरे हे पक्षासोबत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. एकंदर गेल्या महिनाभरापासून मनसेत अंतर्गत राजकारण पेटले असताना मंगळवारी गटनेते ललित कोल्हे यांनी मंगला चौधरी यांनी व्हीप नाकारल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे, यासाठी प्रस्ताव दाखल केला. त्यावर ३० रोजी कामकाज होणार आहे. तर सायंकाळी मंगला चौधरी यांनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कांचन सोनवणेंना संधी द्यावी, अशी विनंती केली आहे. समितीवर त्यांची निवड करीत असल्याचे त्यांना माहिती नसल्याचे सांगत मी दवाखान्यात अॅडमिट असल्याने सभेला येऊ शकली नाही, असाही बचाव चौधरींनी केला आहे.

दरवाजे त्यांनीच बंद केले
मंगला चौधरींनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे. इतर दोघांनी पक्षाच्या विरोधात थेट कार्यवाही केलेली नाही. परंतु त्यांनीच स्वत: पक्षाचे दरवाजे बंद करून घेतले आहेत. तिघांनी गटबाजी केली होती. तसेच उपगटनेते पदाचा राजीनामा मागितला नव्हता. परंतु सपकाळेंनी स्वत: राजीनामा दिल्याने तो स्वीकारल्याचे गटनेते ललित कोल्हे यांनी स्पष्ट केले. चौधरींना संधी दिली होती. राजीनामा त्यांच्याकडे देण्यापेक्षा माझ्याकडे द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले. पार्टी मिटिंगचा अजेंडा तिघांनी घेतला नाही. सद्या पक्षाचा एकच नगरसेवक कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सपकाळेंचा शाब्दिक हल्ला
सभापती निवडीनंतर मिलिंद कोंडू सपकाळेंना पक्षाचे दरवाजे बंद केले असून त्यांनीही पक्षाच्या बैठकांना येऊ नये, असे स्वीकृत नगरसेवक अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. यासंदर्भात सपकाळेंनी जोशींचे नाव घेता मागच्या दरवाजाने येणाऱ्यांना आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला? गटनेत्यांनी आरोप करायला हवे होते तसा त्यांना अधिकार असल्याचे सांगितले. पक्षाच्या बैठकांना येण्याबाबत मला कोणीही कळवलेले नाही. उलट बैठकीचा अजेंडा पाठवण्यात आला होता. गटनेत्यांव्यतिरिक्त इतरांना बोलण्याचा अधिकार नसल्याचेही सपकाळेंनी सांगितले.