आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाकडे १६ लाखांचे घेणे अन‌् वसुली पावणेनऊ काेटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या विकासकामांसाठी मंजूर पावणेनऊ काेटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर वर्ग केल्यानंतर पालिकेनेही अाकड्यांचा खेळ मांडला अाहे. नागरिकांकडून मालमत्ता कराचा भरणा हाेण्याअाधीच महसूलने ती रक्कम पालिकेकडून वसूल करण्याची घाई केल्याचे निदर्शनास अाले अाहे. मंगळवारी केलेल्या गाेळाबेरीजच्या अाधारे महसूलला केवळ १६ लाख रुपये घेणे असल्याची वस्तुस्थिती समाेर अाली अाहे.

मनपाकडे शासकीय करापाेटी माेठ्याप्रमाणात थकबाकी असल्याने तहसीलदार गाेविंद शिंदे यांनी राेहयाे शिक्षणकरासह बिनशेती कराच्या मागणीपाेटी १० काेटी ७० लाख ४१ हजार ११२ रुपये भरण्याची नाेटीस दिली हाेती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्र पाठवून पालिकेचे विकास याेजनेंतर्गतचे काेटी रस्ता अनुदानाचे काेटी ७५ लाख, असे एकूण काेटी ७५ लाख वर्ग करून घेतले हाेते. त्यामुळे नगरसेवक संतापले अाहे. नगरसेवकांकडून विचारणा सुरू झाल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या अर्थ विभागात भरणा केलेल्या रकमांची माहितीची जुळवाजुळव करण्यात अाली.

नाेव्हेंबरपर्यंत केला भरणा
मनपानेमालमत्ताधारकांकडून कराचा भरणा झाल्यानंतर शिक्षण कर राेहयाेची रक्कम नाेव्हेंबर २०१५ पर्यंत महसूलकडे भरल्याची नाेंद अाढळली अाहे. त्यामुळे महसूलचे पालिकेकडे केवळ काेटी लाख ४२ हजार २११ रुपये घेणे असल्याचे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांचे झाले अाहे. यात जिल्हाधिकाऱ्यांचे पुन्हा एक पत्र मंगळवारी पालिकेला प्राप्त झाले असून या महिन्यातील मुद्रांक शुल्काची काेटी ९२ लाखांची रक्कम देखील कराच्या रकमेत वर्ग केल्याचे कळवले अाहे. त्यामुळे महसूल विभागाचे पालिकेकडे केवळ १६ लाख २७ हजार ४०५ रुपये घेणे असल्याचे समाेर अाले अाहे. यासंदर्भात महापाैर नितीन लढ्ढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला अाहे. तसेच मूलभूत साेयीसुविधांचा विकास रस्ता अनुदानाची वर्ग केलेली रक्कम पावणेनऊ काेटी परत विकासकामांसाठी महापालिकेच्या खाती वर्ग करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

अातापर्यंत सुमारे ६० टक्के वसुली
पालिकेतर्फे मालमत्ता कर वसुली विभागाच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना बिल अदा केले जाते. त्यानुसार पालिका कराच्या माध्यमातून उत्पन्न गृहीत धरते. त्याच अाधारे महसूलदेखील कराची मागणी करीत असते. पालिकेची अातापर्यंत ६० टक्के वसुली झाली अाहे. नागरिकांनी कराचा भरणा केल्यानंतर महिन्याच्या शेवटी िशक्षणकर राेहयाेची रक्कम भरणा केली जाते. पालिकेची अद्याप ४० टक्के वसुली राहिली असून त्यात वादग्रस्त वसुलीचा अाकडा अधिक असल्याने ती वसूल हाेत नाही. त्यामुळे पालिकेकडे मागणी वाढते. नागरिकांनी कर भरल्याशिवाय पालिका प्रशासन महसूलचा कर भरू शकत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.

मनपाचा दावा गैर लागू
महापालिकेकडे शिक्षण कर राेहयाे कराची २०१२ पासून अाजपर्यंतची थकबाकी १० काेटींपेक्षा जास्त असून त्या पूर्वीची माहिती घेतल्यास त्यात अाणखी वाढ हाेईल. पालिकेची अार्थिक घडी विस्कटल्यापासून थकबाकीची रक्कम वाढत गेल्याने भरणा केलेला नाही. केवळ मुद्रांक शुल्काची रक्कम वर्ग केली जात हाेती. त्यामुळे पालिकेने केलेला दावा गैर लागू अाहे. गाेविंद शिंदे, तहसीलदार.

२०१२ ते २०१६ पयर्तं भरणा केलेली अाकडेवारी अशी
०५ काेटी२८ हजार ४०६ रुपये (२०१२-१३)
०४काेटी८६ लाख १० हजार २१२ रुपये (२०१३-१४)
०४काेटी९३ लाख ३१ हजार ७४९ रुपये (२०१४-१५)
०४काेटी४६ लाख ४३ हजार ७३१ रुपये (२०१५-१६)
बातम्या आणखी आहेत...