आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलमंत्री खडसे आज धुळयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे उद्या रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते दुपारी चार वाजता दोंडाईचा येथे आमदार जयकुमार रावल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असतील. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहात येतील.

त्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांच्या हस्ते गरुड हायस्कूलच्या मैदानावर सिनिक रोव्हर बिल्डकॉनचा समारोप होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता वाखारकरनगरात त्यांच्या उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यावर मंत्री खडसे रात्री साडेआठ वाजता भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्या निवासस्थानी जातील.