आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हर्स गेलेल्या ट्रकने कारसह पाच वाहने दाबली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उभ्याट्रकमध्ये उदबत्ती लावण्यास गेलेल्या चालकाकडून ट्रक नियंत्रित झाल्याने तो मागे (रिव्हर्स) जाऊन त्याखाली कार चार दुचाकी दाबल्या गेल्या. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पांडे चौकात घडली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात वाहनमालक ट्रकमालक यांच्यात गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा सुरू होती.

पांडे चौकात माजी महापौर लक्ष्मीकांत चौधरी यांच्या घरासमोर दयाराम दशरथ चौधरी यांचा ट्रक (एडब्ल्यूडी- ७०८०) हा पांडे चौकाकडे तोंड करून उभा होता. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ट्रकचालक ट्रकमध्ये अगरबत्ती लावण्यासाठी गेला हाेता. त्या वेळी त्याने ट्रक सुरू केला; मात्र उतार असल्याने ट्रक मागे जात असताना ब्रेक दाबूनही थांबला नाही. त्यामुळे चालकाने ट्रकमधून उडी मारली. ट्रक जवळपास ३० फूट मागे (रिव्हर्स) गेला. या ट्रकमागे १५ फुटांवर उभी असलेल्या इंडिका कारवर आदळला. तरीही ट्रक थांबला नाही तो तसाच कारसह मागे जात राहिला. त्यानंतर ट्रकने अंगणात उभ्या असलेल्या चार दुचाकींना धडक दिली. ही वाहनेही कारखाली दाबली गेली. या अपघातानंतर परिसरात माेठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.

अपूर्ण हाेते एअर ब्रेकचे काम
ट्रकशुक्रवारी गॅरेजला नेऊन एअर ब्रेकचे काम करण्यात आले होते. मात्र, ते अपूर्ण राहिले होते. एअरब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक रिव्हर्स गेल्याने हा अपघात झाल्याची या वेळी चर्चा हाेती.
या गाड्यांचे झाले नुकसान
ट्रकखाली दाबली गेल्याने स्कूटी (एमएच १९ डीई ७१२८) हिरो होंडा (एमएच १९ एजे ९८७६)चे झालेले नुकसान. संजय पारधे यांची इंडिका व्हिस्टा (एमएच- १९, बीजे- ३१४४), शरद साेमा माळी यांची स्कुटी (एमएच- १९, डीई- ७१२८), राहुल शालिग्राम माळी यांची हीराे हाेंडा (एमएच- १९, डीएम- ७३६९) संजय देवराम माळी यांची हीराे हाेंडा (एमएच- १९, एके- १३१५) एमएच- १९, एबी- ९८७६ या क्रमांकांची हीराे हाेंडा या पाच गाड्या ट्रकखाली दबल्या.
बातम्या आणखी आहेत...