आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये रिव्हॉल्व्हर; खबरीमुळे एसटी, पोलिसांची उडाली झोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावहून अाैरंगाबादला अाराेपी घेऊन गेलेल्या पाेलिसांची दाेन रिव्हाॅल्व्हर असलेली बॅग एसटी बसमध्येच राहून गेल्यासंदर्भात शुक्रवारी रात्री अालेली खबर एस.टी.प्रशासनासाेबत पाेलिसांचीही झाेप उडवणारी ठरली. पाेलिसांच्या तपासणीत काेणतीही बॅग अाढळून अाल्याने ‘ताे’ निराेप नक्की काेठून अाला अाणि काेणी दिला? याबाबत रात्री उशिरापर्यंत मात्र उलगडा हाेऊ शकला नाही. विशेष म्हणजे अाैरंगाबादसह जळगाव पाेलिस कंट्राेल रुमला याबाबत काेणतीही नाेंद करण्यात अालेली नाही. या घटनेमागे खबऱ्याचा नेमका हेतू काय होता, यावर चर्चा सुरू अाहे.
जळगाव अागाराची जळगाव- अाैरंगाबाद (क्रमांक एम.एच २०, बी.एल, ४०९७) ही विना वाहकाची बस जळगाव स्थानकातून शुक्रवारी दुपारी वाजता अाैरंगाबादकडे रवाना झाली.

हाॅटेलला थांबली बस
विनावाहक बस लांबपल्ल्याच्या प्रवासानंतर फर्दापूर येथील हाॅटेल के.पी.पार्क येथे थांबवण्यात अाल्याची माहिती चालक महेंद्र खैरनार यांनी एटीअाय नाईक यांना दिली. या वेळी त्यांनी यावल डेपाेची ब्रेक डाऊन झालेल्या बसमधील २२ प्रवासी देखील अापल्या बसमध्ये बसवले. दरम्यान, अधिकाऱ्यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यात काेणतीही बॅग नसल्याने ती काेणी उतरवली, माहिती देणारा नेमका काेण हाेता त्यात खरंच बॅग हाेती का नाही, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित हाेत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...