आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वाळू ठेकेदारांचा रिव्हाॅल्वर परवाना रद्द, पोलिस अधीक्षकांनी केली होती शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी, सुनील रामनारायण मंत्री आणि परेश दिलीप कोल्हे या तिघांचे रिव्हाॅल्वरचे शस्त्र परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. पोलिस अधीक्षकांनी तिघांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
 
सागर चौधरी, सुनील मंत्री परेश कोल्हे हे वाळू ठेकेदार अाहेत. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून महसूल अधिकारी कर्मचारी यांना दमदाटी करू शकतात. त्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची शिफारस पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हादंडाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांना केली होती. या अहवालानुसार जिल्हादंडाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी जळगावात सार्वजनिक शांतता राखण्याच्या किंवा सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या तिघांकडील शस्त्र परवाने रद्द केले आहेत. जळगावात सार्वजनिक शांतता सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात अाला. जळगाव जिल्ह्यात एकूण ६२ वाळूचे ठेके असून त्यापैकी ३२ वाळू गटांचा लिलाव झालेला आहे.
 
प्रतिकूल शेऱ्यानंतरही चौधरीला शस्त्र परवाना
सागरचौधरी यांना शस्त्र परवाना देताना अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी प्रतिकूल शेरा दिलेला होता. चौधरी यांच्या भावाचा मृत्यू झालेला आहे. ते वाळू व्यावसायिक आहेत. शिवाय त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. केवळ त्यांच्या सुरक्षिततेच्या शस्त्र परवाना देणे योग्य होणार नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पाेलिस बंदोबस्त द्यावा, असा प्रतिकूल शेरा त्यांनी दिलेला होता. त्यानंतरही तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी अनुकूल अहवाल दिल्याने सागर चौधरी यांना शस्त्र परवाना मिळाला होता.
बातम्या आणखी आहेत...