आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RH Pregnancy Test Issue At Jalgaon, Divya Marathi

गर्भावस्थेतच करा आरएच टाइपची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गर्भावस्थेच्या प्रारंभिक अवस्थेतच गर्भाचा रक्तगट व आरएच टाइपची तपासणी केली जाते. प्रत्येक व्यक्तीला आपला रक्तगट व आरएच टाइप गृप माहिती असणे आवश्यक असते. कारण शरीरास रक्त देण्यावेळी किंवा रक्तदान करताना ही माहिती उपयुक्त ठरत असते. आईचे आरएच टाइप हे निगेटिव्ह असेल आणि वडिलांचे पॉझिटिव्ह असेल तर बाळाचे आरएच टाइप निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हही असू शकते. गर्भधारणेत शरीराची अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. महिलेच्या आरोग्यासह बाळाचे आरोग्यदेखील याच्याशी जुळलेले असल्याने गर्भधारणेत जर निष्काळजीपणा झाला तर याचा परिणाम बाळावरही होत असतो.

हा असू शकतो धोका
गर्भात वाढणारे बाळ आरएच पॉझिटिव्ह असेल तर आरएच आजार किंवा आरएच युनिझेशनचा धोका वाढू शकतो. प्रसूतीदरम्यान काही प्रमाणात बाळाचे रक्त हे आईच्या रक्तात मिसळत असते. आरएच निगेटिव्ह असलेले आईचे शरीर मुलाच्या पॉझिटिव्ह रक्ताच्या कणिकांच्या विरोधात शरीरात अँटिबॉडीज बनवते. हे बाळाच्या रक्त कणिकांना नष्ट करते. यामुळे मुलाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होऊन त्यास अँनिमिया होतो. तसेच रक्ताच्या कमतरतेमुळे मुलाचे ह्रदय निकामी होण्याची शक्तता असते, यामुळे गर्भातच मुलाचे प्राण जाऊ शकतात. आरएच या आजाराने पीडित असलेल्या बाळास हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कावीळ होऊ शकतो. रक्त कमी झाल्याने मेंदूवरही याचा परिणाम होऊ शकतो.

अशी घ्यावी काळजी
आरएच आजारापासून सांभाळ करण्यासाठी मुलाच्या जन्मानंतर 72 तासांच्या आत जर मुलगा आरएच पॉझिटिव्ह असल्याचे समजले तर आईला ‘अँटी डी’चे इंजेक्शन दिले जाते. गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात हे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.