आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारचाकीने कट मारल्याने रिक्षा 30 फुटावरून खाली काेसळली, चालक गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - भरधाव चारचाकीने रिक्षाला कट मारल्यामुळे शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळ रिक्षा ३० फुट खोल जागेत कोसळल्याची घटना साेमवारी दुपारी वाजता घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे अर्धा तास वाहतूक खाेळंबली हाेती. 

 

पिंप्राळा येथील रिक्षाचालक सागर कोळी हा सोमवारी दुपारी वाजता रिक्षाने (क्रमांक एमएच-१९, जे, ६८९३) राष्ट्रीय महामार्गावरील शिव कॉलनीकडून गुजराल पेट्रोल पंपाकडे जात होता. उड्डाणपुल सुरू होण्याच्या काही मीटर आधी उतारावर समोरून येणाऱ्या एका चारचाकीने रिक्षाला कट मारल्याने चालक कोळी याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा डाव्या बाजूला असलेल्या सुमारे ३० फुट खोलगट भागात घरंगळत खाली काेसळली.. सुदैवाने रिक्षात कोणीही प्रवासी नव्हते त्यामुळे कुठलीही विपरीत घटना घडली नाही; परंतु रिक्षाचालक कोळी यांना जबर दुखापत झाली. रिक्षा खाली कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ कोळी यांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु रिक्षाला कट मारणारी चारचाकी थांबताच निघुन गेली. रिक्षा घसरल्यामुळे रस्त्यावरील इतर प्रवाशांनी देखील चारचाकीकडे लक्ष देता रिक्षाचालकास वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. 

 

सहा महिन्यात दुसरी घटना 
सहामहिन्यांपूर्वी उड्डाणपुलाजवळ एका टेंट हाऊसची रिक्षा कलंडली होती. या वेळी देखील चालकाला दुखापत झाली होती. महामार्ग अत्यंत अरुंद असून वाहनांची संख्या जास्त होत असल्यामुळे दररोज अपघातांची संख्या वाढते आहे. सोमवारी कोळी यांच्या रिक्षाला कट मारल्याचा प्रकार देखील अरुंद महामार्गामुळेच झाला. 


सुदैवाने अप्रिय घटना टळली 
कोळीहे शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. सोमवारी नियमितपणे सकाळी ते १२ या वेळेत त्यांनी विद्यार्थ्यांची वाहतूक केली होती. त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले होते. सुदैवाने रिक्षात विद्यार्थी नसल्यामुळे मोठी अप्रिय घटना टळली. तसेच कोळी यांची रिक्षा खाली कोसळली त्या ठिकाणी देखील लहान मुलांनी झाडांना झोके बांधलेले होते. रिक्षा कोसळली त्यावेळी झोक्यांच्या शेजारी मुले नव्हती. अन्यथा तेथे देखील अप्रिय घटना घडली असती. 

बातम्या आणखी आहेत...