आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेची धडक मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मद्य पिऊन रिक्षा चालवणे, गणवेश घालण्यास टाळाटाळ, रस्त्याच्या मधोमध पार्किंग आणि प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात शहर वाहतूक विभागातर्फे लवकरच धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. मंगळवारी पोलिस मुख्यालयासमोरील रस्त्यावर एका मद्यधुंद चालकाची रिक्षा थेट दुभाजकावरच धडकली होती. या घटनेनंतर वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. शहर बस वाहतूक बंद असल्याने रिक्षा हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. शहरात सुमारे १५ हजारांवर रिक्षा असून प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अडवणूक केली जाते. अनेक वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. शविाय रेल्वेस्थानक, बसस्थानकासह अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग केली जाते. बहुतांश रिक्षाचालक गणवेश घालत नाहीत, बिल्लाही लावत नाहीत. भाड्यावरून प्रवाशांची अडवणूक हुज्जत घातली जाते. अनेक रिक्षाचालक दविसाही मद्यपान करून रिक्षा चालवतात. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी रिक्षेचा प्रवास करणेही कठीण असते. अशा अनेक तक्रारी आहेत. याचाच परिणाम म्हणून मंगळवारी एका मद्यधुंद चालकाची रिक्षा थेट दुभाजकावरच धडकली होती. पोलिस मुख्यालयासमोरील रस्त्यावर सुदैवाने वर्दळ कमी असल्याने मोठा अपघात झाला नाही. मात्र, स्वत: चालकच जबर जखमी झाला होता. त्यामुळे वाहतूक शाखेने आता कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतल्याचे वाहतूक निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सांगितले.

वाहतूक विभागाकडे तक्रार करावी
प्रवाशांशी रिक्षाचालक उर्मट वागत असेल, मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत असेल तर प्रवाशांनी वाहतूक विभागाकडे तक्रार करावी. तसेच वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध स्वतंत्र मोहीम हाती घेतली असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रकांतसरोदे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

शहरात ब्रेथ अॅनालायझर
दारूपिऊन वाहने चालवणाऱ्यांच्या तपासणीसाठी शहरातील सहा पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक आणि शहर वाहतूक विभागाकडे दोन असे एकूण आठ ब्रेथ अॅनालायझर आहेत. जानेवारी ते जुलै महिन्यात ४७ मद्यपी वाहनधारकांवर कारवाई केली आहे. त्यात रिक्षाचालकांचाही समावेश आहे.

जळगावात १५ हजार ३२१ रिक्षा
बेभरवशाच्यामनपाच्या शहर बस वाहतूक सेवेमुळे जळगावकरांचा रिक्षाच आधार बनली आहे. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे शहरातदेखील रिक्षांची संख्या वाढली असून ती आता १५ हजार ३२१ झाली आहे. शहरात अधिकृत ९५ रिक्षा थांबे आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रिक्षाचालक रस्त्याच्या मध्येच पार्किंगकरून प्रवाशांची वाट बघतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

३००० रुपयांपर्यंत दंड
मद्यपानकरून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकास सुमारे हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना न्यायालयात हजर केले जाते. त्यांना ५०० ते ३००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्या अथवा गणवेश घालणाऱ्या रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिस जागच्या जागी १०० रुपयांचा दंड वसूल करू शकतात.

चालकांना गणवेश आवश्यक
मालकस्वत: रिक्षा चालवत असेल तर, त्याने पांढऱ्या रंगाचा गणवेश घालणे आवश्यक आहे. मालकाव्यतिरिक्त इतर चालक रिक्षा चालवत असेल तर त्याने खाकी रंगाचा गणवेश घालणे बंधनकारक आहे. मात्र, काही रिक्षाचालक वगळता कोणीही गणवेश घालत नसल्याचे शहरात चित्र आहे. त्यामुळे आता गणवेश घालणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...