आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंतूरच्या युवतीची देहव्यापारातून सुटका, कारवाईने खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
भुसावळ- परभणी जिल्ह्यातील १८ वर्षीय युवतीला शहरातील वैतागवाडी भागात बळजबरीने अनैतिक देहव्यापारास भाग पाडणाऱ्या घर मालकीणीविरुद्ध सोमवारी रात्री बाजारपेठ पाेलिस ठाण्यात ‘स्त्रिया मुलींचा अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम’ (पीटा अॅक्ट)नुसार गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीस जळगाव अाशादीप महिला सुधारगृहात रवाना केले. 

वैतागवाडीत तीन महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती. या भागात पुन्हा देहव्यापार बोकाळला आहे. येथे एका १८ वर्षीय मुलीस बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलल्याची माहिती जळगाव येथील एलसीबीचे निरीक्षक राजेद्रसिंह चंदेल यांना मिळाली. यानुसार त्यांनी पथक पाठवून खातरजमा केली. यानंतर उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख सहकाऱ्यांनी सोमवारी (दि.१४) रात्री जिंतूर येथील पीडित युवतीची नरकयातनेतून सुटका केली. चौकशीत मीना उर्फ बेबी शेख हमीद (रा.वैतागवाडी, भुसावळ) ही महिला संबंधित युवतीला बळजबरीने देहव्यापार करावयास लावत हाेती, असे समोर आले. पाेलिस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री मीना उर्फ बेबी शेख हमीद हिच्याविरुद्ध पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...