आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षावाल्या काकांनी दिली मुलांना पार्टी, शेवटच्या दिवशी उद्यानात खेळण्याचा लुटला आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना सुट्या लागल्याने वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या रिक्षावाल्या काकांनी पार्टी दिल्याने बहिणाबाई उद्यानात आनंद लुटताना विद्यार्थी. - Divya Marathi
मुलांना सुट्या लागल्याने वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या रिक्षावाल्या काकांनी पार्टी दिल्याने बहिणाबाई उद्यानात आनंद लुटताना विद्यार्थी.
जळगाव - शहरात साेमवारी बऱ्याच प्राथमिक माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर झाला. त्यामुळे मंगळवारपासून विद्यार्थ्यांना सुटी लागणार अाहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळेचा हा शेवटचा दिवस स्मरणात राहण्यासाठी साेमवारी मुलांना ने-अाण करणाऱ्या रिक्षावाल्या काकांनी विद्यार्थ्यांसाेबत बहिणाबाई उद्यानात धम्माल केली.
 
रिक्षाचालक राजेंद्र शिंपी हे अाेरियन स्कूलच्या विद्यार्थ्यांची शालेय वाहतूक करतात. साेमवारी पेपर सुटल्यानंतर वी ते वी दरम्यानच्या १० ते १५ विद्यार्थ्यांना शिंपी यांनी बहिणाबाई उद्यानात अाणले हाेते. शिंपी दरवर्षी मुलांना शाळेच्या शेवटच्या दिवशी उद्यानात घेऊन जातात. तेथे ते मुलांशी मनसाेक्त गप्पा मारून खेळतात. साेमवारी देखील त्यांनी मुलांसाेबत धम्माल करत त्यांना पार्टी दिली. या वेळी मुलांचे पालक शिंपी यांचा परिवार देखील उपस्थित हाेता. त्याचप्रमाणे सुनील काेळी अक्षय शिंपी यांनी देखील नंदिनीबाई विद्यालयाच्या मुलींना बहिणाबाई उद्यानात अाणले. याठिकाणी मुलींनी मनसाेक्त खेळण्याचा अानंद लुटला. त्यानंतर दुपारी सर्व मुलांना घरी पाेहचवले. दरवर्षी वेगवेगळ्या उद्यानात हे काका मुलींना घेऊन जात असतात. त्यांच्या या उपक्रमाचे पालकांनी काैतुक केले अाहे.
 
शाळेचा शेवटचा दिवस स्मरणात राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून नियाेजन करण्यात येत होते. त्यानुसार साेमवारी काही शाळेच्या मुलांनी धम्माल केली. यात त्यांनी बर्फाच्या गाेळ्याची पार्टी, नाश्ता, समाेसा तर चाॅकलेटची रिक्षावाल्या काकांकडे मागणी केली. रिक्षावाल्या काकांनी देखील मुलांचा हट्ट पूर्ण करत पार्टी दिली. तसेच मुले वैयक्तिक देखील नियाेजन करीत असून एखाद्या मित्राच्या घरी जमणे, बगिच्यात जमणे, अाइस्क्रिम पार्लरला एकत्रित जाणे, यासारखे ते सध्या नियाेजन करीत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...