आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horrible Pics: जळगावात तणाव, दुकानांची तोडफोड, लोकांना मारहाण, उडाली धुमश्चक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमावाने गोलाणी मार्केटमध्ये हल्ला केल्याने परिसरात नागरिकांची अशी पळापळ झाली. - Divya Marathi
जमावाने गोलाणी मार्केटमध्ये हल्ला केल्याने परिसरात नागरिकांची अशी पळापळ झाली.
जळगाव- व्हॉटस्अॅपवर प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संतप्त टोळक्याने गोलाणी मार्केटवर हल्ला केला. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या या संतप्त तरुणांच्या जमावाने दुकानांना टार्गेट केले. घोषणाबाजी करीत हा जमाव तीन बाजूंनी गटागटाने गोलाणी मार्केटवर चालून आला. हल्लेखोरांनी मार्केटमध्ये तोडफोड करून नागरिकांवर दगड आणि चहाच्या ग्लासांचा तुफान मारा केल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडाला. जमावाच्या या हल्ल्यात धरणगाव येथील एक मध्यवयीन गृहस्थाचा डोळ्याला जबर दुखापत झाली. तसेच मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक, व्यापारी यांनाही किरकोळ जखमा झाल्या. त्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.
दरम्यान, गोलाणीत गोंधळ झाल्याचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच फुले मार्केट, सुभाष चौकातील व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली. गोलाणी मार्केटमधील दंगलीप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी व्हाॅट्सअॅपवरून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको करून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच काही गाड्यांच्या काचाही फोडल्या होत्या. त्यापाठोपाठ शुक्रवारी ही घटना घडली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंचा जमावा
व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ अल्पसंख्याक विकास परिषदेतर्फे डॉ. मोबिन अशरफी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देण्यासाठी शेकडोंचा जमावा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. तिथेही या जमावाने गोंधळ घातला. निवेदन दिल्यानंतर तेथून ४० ते ५० जणांचा जमाव गोलाणी मार्केटकडे आला. या जमावातील तरुणांनी मार्केटच्या तिन्ही बाजूंना पसरून एकाच वेळी आत प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांनी दिसेल त्या वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली. ‘मार्केट बंद करो’ असे म्हणत त्यांनी शिवीगाळही केली. त्यातील काही जणांनी हातात लाठ्या-काठ्या, दगड घेऊन दहशत पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गाेलाणीतील तिन्ही मजल्यांवर एकाचवेळी गोंधळ सुरू झाल्याने मार्केटमधील व्यापारी, दुकानदार, नागरिक रहिवासी भांबावले. जमावातील काही युवकांनी चहाच्या दुकानावरील सर्व ग्लास हातात घेऊन ते इतर दुकानांमध्ये मारून फेकले. यात काही लोकांना ग्लासाचे काच लागून ते जखमी झाले. दुकानातील टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. काही पोस्टर्स, फोटो ओरबाडून ते पायाने चिरडले. या दगडफेकीत साई सागर मोबाइल, गजानन मेटल या दुकानांचे सर्वाधिक नुकसान झाले.
लाठ्या - काठ्या अन दगडफेक...
गोंधळ घालणाऱ्या माथेफिरुंनी धरणगाव येथील उज्ज्वल शुक्ल नामक व्यक्तीच्या डोक्यात काठी मारून त्यांना जखमी केले. त्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली असून डोळा निकामी झाला. हा गोंधळ सुरू असतानाच वरच्या मजल्यावरील काही दुकानदारांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाच्या दिशने धाव घेतली. त्यानंतर तळमजल्यावरून देखील व्यापाऱ्यांनी वर येऊन दगडफेक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्यासह पळून जात असलेल्या आणखी एकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात एक जण पळून गेला. घटनास्थळवरून पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. घटनेच्या अर्ध्या तासांतच पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गोलाणी मार्केटमध्ये भेट दिली. त्यांच्या समक्ष संतप्त व्यापाऱ्यांनी घोषणा दिल्या. त्यांनी जमाव शांत करीत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर बाजारपेठ सुरुळीत झाली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे आणले लाकडी दांडे... किती जणांना घेतले ताब्यात....
आणि पाहा, दंगलीचे विशेष Photos....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...