अमळनेर - तालुक्यातीलवासरे येथे शुक्रवारची पहाट प्रचंड दहशतीची उगवली. राजकीय धुसफुशीचे रूपांतर पाण्याच्या किरकोळ कारणावरून वादात झाले आणि एका गटातील लोकांनी दुसऱ्या गटातील लोकांना जबर मारहाण केली. तसेच दुसऱ्या गटातील लाेकांनीही बचावाच्या प्रयत्नात दुसऱ्या गटातील लाेकांना मारहाण केली. त्यामुळे दाेन्ही गटात तंुबळ हाणामारी झाली. वासरे येथे सकाळी वाजता घडलेल्या या घटनेनंतर साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल २५ जखमींसह नातेवाइकांनी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली होती. २५पैकी गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रवीण दयाराम पाटील या ग्रामपंचायत सदस्यासह इतर ४० ते ५० जणांनी लाकडी दांडके, लोखंडी सळया, कुऱ्हाड टिकावने शुक्रवारी पहाटे दुसऱ्या गटातील २५ जणांना बेदम मारहाण केली. तसेच कळमसरे येथे जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वाहनाची तोडफोड करत चालक दत्तू जगन्नाथ पाटील यालाही बेदम मारहाण केली. घरात घुसून प्रत्येक सदस्यावर हल्ला चढवला. त्यामुळे जखमी झालेले लाेक रस्त्यावर विव्हळत पडले होते.
घटनेतीलजखमी
यातअशोक रघुनाथ पाटील, देविदास साहेबराव पाटील, सागर शंकर पाटील, मंगलाबाई शंकर पाटील, आशाबाई गुलाबराव पाटील, रवींद्र जुगराज पाटील, विजय झिपरू पाटील, लोटन गिरधर पाटील, सुनील खंडू पाटील, बाबाजी खंडू पाटील, लोटन लीलाधर पाटील, गिरधर खंडू पाटील, चंद्रभान साहेबराव पाटील, दत्तात्रय जगन्नाथ पाटील, तुकाराम अशोक पाटील, शंकर रघुनाथ पाटील, अमोल शंकर पाटील, मनोहर खुशाल पाटील, सुशीलाबाई किसन पाटील, इंदुबाई भीमराव पाटील, लताबाई झिपरू पाटील, रंजनाबाई भीमराव पाटील सुनंदाबाई लीलाधर पाटील हे जखमी झालेत. वैजयंताबाई खंडेराव पाटील या ७०वर्षीय महिलेलाही मारहाण झाली.