आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटचा बॉल लागला; नंदुरबारात उसळली दंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नंदुरबारात दंगलीमुळे रस्त्यांवर दगडाचा असा खच पडला. दुस-या छायाचित्रात जाळपोळीनंतर आग विझवताना पोलिस.
नंदुरबार - बेकायदेशीर कत्तलखाने बंद करा, गोमांस तस्करी बंद करा, या मागणीसाठी नंदुरबार, नवापूरला कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, बंधारहट्टी भागात क्रिकेटचा बॉल लागल्याच्या कारणावरून माळीवाडा परिसरात दुपारी वाजेच्या सुमारास दंगल उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सायंकाळी संचारबंदी लागू केली. गुरुवारी संध्याकाळी सहापर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. दरम्यान, जळगावहून १५० पोलिसांना बंदाेबस्तासाठी पाठविण्यात आले आहे.
नंदुरबारातील ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांचा ताफा उशिरा पोहोचल्याने दंगल नियंत्रणाबाहेरगेली. शहरातील अनेक भागात दंगलीचे लोण पसरले.
दगडफेकीत घटनेत अप्पर पोलिस अधीक्षक अनिता पाटील यांच्यासह एक पोलिस कॉन्स्टेबलही जखमी झाला आहे. दुपारी चार वाजता माळीवाडा परिसरात दंगल उसळली. ही दंगल उशिरापर्यंत सुरूच होती. त्यानंतर दंगलीचे लोण जळका बाजार परिसरात पोहाेचले. तसेच बोहरी गल्लीत तर दोन्ही बाजूंनी जमाव चालून आला. तलवारी घेऊन हा जमाव विजय बांगड यांच्या घरात घुसला. त्यांनी एलसीडी फोडला. त्यानंतर फ्रीज उचलून बाहेर फेकून दिला. या भागातील नागरिकांनी पोलिसांना वारंवार फोन केला. मात्र, पोलिस उशिरा पोहाेचल्याने या भागात उभ्या असलेल्या १६ लाख रुपये किमतीच्या वाहनावर दंगलखोरांनी हल्ला चढविला. वाहनाच्या काचा फोडल्या. तसेच चहुबाजूने वाहनाची नासधूस केली.

दो शाह तकिया बाजारात तालुका पोलिस निरीक्षक शिरसाठ यांच्यासह केवळ पाच कॉन्स्टेबल उपस्थित होते. २०० पेक्षा अधिक तरुणांचा जमाव उभा होता. पोलिसांकडे पाहून तो जमाव पुढे येऊ शकला नाही. मात्र, या ठिकाणी जमावाने हल्ला करण्याचे ठरवले असते तर पोलिसांना धोका होता.

सकाळी उपोषण मागे
जिल्ह्यातीलबेकायदेशीर कत्तलखाने बंद करा, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दला‌तर्फे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. बेकायदेशीर कत्तलखाना बंद करण्यासाठी उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.